आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिशांना कात्री:म्हाडा लॉटरीतून गृहस्वप्नपूर्ती; बांधकाम साहित्य महागल्याने कागदावरच इमारती ; 3 वर्षांपासून प्लॉट रिकामाच पडून

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वसामान्यांना परवडणारी घरे देणाऱ्या महाराष्ट्र गृह निर्माण संस्था अर्थातच म्हाडाच्या कागदी घोडे नाचवण्याच्या प्रकारामुळे लॉटरी लागलेल्या सर्वसामान्यांच्या घरांचे स्वप्न आता भंगले आहे. २०१९ मध्ये निविदा प्रक्रिया राबवूनही नियोजित जागेवर तीन वर्षे उलटल्यानंतरही अद्याप बांधकामाचा खडा देखील पडलेला नाही. दरम्यानच्या काळात लोखंड व सिमेंटच्या किमतीत मोठी वाढ झाल्याने संबंधित मक्तेदाराने काम करण्यास नकार दिला. परिणामी लॉटरी लागलेल्या ग्राहकांच्या खिशांना आता दीड ते दोन लाख रुपयांच्या वाढीव किमतीची कात्री बसणार असल्याचे संकेत आहेत.

लाल फितीत गृहस्वप्न म्हाडाच्या वतीने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या बांधकामासाठी १० कोटी रुपयांपेक्षा अधिकचा खर्च येणार आहे. शासनाच्या नवीन नियमामुळे १० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च असलेल्या कामासाठी शासनाची परवानगी घेणे आवश्यक आहे. म्हाडाच्या वतीने त्याबाबत मागील वर्षभरापासून पाठपुरावा करून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. तसेच मुख्य अभियंत्यांकडून मार्गदर्शन मागवले आहे. मात्र अद्यापपावेतो कोणत्याही प्रकारचे मार्गदर्शन अथवा उत्तर म्हाडाला आलेले नसल्याचे समजते.

निविदा रद्द करण्याची वेळ तीन वर्षांपूर्वी या कामाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली होती. त्यामुळे तेव्हाच प्रत्यक्ष जागेवर काम सुरू करणे आवश्यक होते. मात्र तसे न केल्यामुळे दिवसेंदिवस बांधकामासाठी लागणाऱ्या साहित्याची किंमत वाढत गेली. त्यामुळे ठेकेदाराने म्हाडाकडे दर वाढवून देण्याची मागणी केली. मात्र याबाबतचा निर्णय मुंबईतच होत असल्याने स्थानिक व्यवस्थापनाने संबंधित ठेकेदारास काम सुरू करण्याची वारंवार विनंती केली. मात्र वाढीव दर मिळाल्याशिवाय काम करण्यास ठेकेदाराने असमर्थता दर्शवली. परिणामी आता एक तर जुनी निविदा रद्द करून नव्याने निविदा प्रक्रिया राबवावी लागण्याची शक्यता आहे.

बातम्या आणखी आहेत...