आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामानव अधिकार संवर्धन संघटन संस्थेच्या ‘मिशन एकलव्य' अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी ‘परदेशात शिकण्याच्या संधी' या विषयावर ‘मेंटोरिया डॉट इन' चे संस्थापक ॲड. कबीर ननावरे यांचा सेमिनार आयोजित करण्यात आला हाेता. त्यांनी गरजू विद्यार्थ्यांना परदेशातील संधीबाबत मार्गदर्शन केले.मानव अधिकार संवर्धन संघटन संस्था नाशिक जिल्ह्यामध्ये सामाजिक काम करत आहे. या कामाचा एक भाग म्हणून संस्थेद्वारे शहरातील शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी नसताना, प्रतिकूल परिस्थितीवर मात करून, प्रथम प्रयत्नांत दहावी परीक्षेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा दरवर्षी एकलव्य गौरव पुरस्कार प्रदान करून सन्मान करण्यात येतो.
शैक्षणिक मदतीसोबतच संवैधानिक मूल्यांची रुजवणूक करण्यासाठी कार्यक्रम घेतले जातात. या विद्यार्थ्यांसाठी रविवारी (दि.४) सेमिनार आयोजित करण्यात आला. परदेशातील अभ्यासाचे अभ्यास क्षेत्र विद्यार्थ्यांना विशेषतः गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी ॲड. कबीर ननावरे यांनी विद्यार्थ्यांना या विषयावर मार्गदर्शन केले.
परदेशात शिकण्याचा स्वतःच्या अनुभवाबद्दल सांगत असताना कबीर यांनी परदेशात जाऊन शिक्षण का घ्यावे?या शिक्षणाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत, त्या कशा मिळवायच्या,त्यासाठीच्या पूर्वपरीक्षा - तयारी, जाण्यासाठी लागणारे कागदपत्रे, शिष्यवृत्ती, निधी मिळवण्याची प्रक्रिया व इतर विषयांबद्दल विद्यार्थ्यांशी संवाद साधला.वक्त्यांचा परिचय पूजा तुपसमुद्रे यांनी करून दिला. आभार बुद्धभूषण तेजाळे आणि सूत्रसंचालन विद्यार्थी समन्वयक शंतनु भाले यांनी केले. डॉ मिलिंद वाघ व प्रकल्प समन्वयक तल्हा शेख कार्यक्रमासाठी उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.