आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक:स्मशानभूमीअभावी पावसात ताडपत्री लावून अंत्यसंस्कार, सुरगाण्यातील पिळूकपाडा येथील विदारक चित्र

नाशिक / मनोहर घोणे4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकीकडे देशाचा ७५ वा स्वातंत्र्यदिन सर्वत्र उत्साहात साजरा केला गेला. या अमृतमहोत्सवी वर्षाचे निमित्त साधून केंद्र सरकारने विविध विकासात्मक स्पर्धांचेही आयोजन केले. दुसरीकडे मात्र स्मशानभूमी नसल्याने सुरगाणा तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीतील पिळूकपाडा आदिवासी पाड्यावर भरपावसात ताडपत्री धरून कैलास किसन बागुल या मृत युवकावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आली. आदिवासी विकासासाठी केंद्र व राज्य शासनाकडून दरवर्षी कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो. तरीही प्रशासनाची उदासीनता व लाेकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील अनेक वाड्या, वस्त्या, पाडे विकासापासून कोसो दूर आहेत.

रस्ते नसल्याने झाेळी करून रुग्णांना पायीच दवाखान्यात घेऊन जावे लागते. या वस्त्यांवर अंत्यसंस्कारासाठी साधे शेड उभारले नसल्याने राना- वनात मृतावर अंत्यसंस्कार केले जातात. केंद्र सरकारकडून १४ व्या व १५ व्या वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना वर्ग केला जातो. तसेच जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आमदारांनाही एक ते दोन कोटी रुपयांचा निधी दिला जातो. या निधीतून वर्षानुवर्षे एकाच रस्त्यावर दोन-दोन वेळा खर्च केला जातो.

माळेगावात एकही स्मशानभूमी नाही
माळेगाव ग्रामपंचायतींमध्ये सात गावांचा समावेश असून यातील एकाही गावात स्मशानभूमी नाही. यातील रस्ता नसलेले एक गाव ८ किलोमीटर तर दुसरे गाव ३ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे आमच्या गावातील मृतांना मृत्यूनंतरही यातना सोसाव्या लागत आहेत. - दीपक गावित, स्थानिक युवक

बातम्या आणखी आहेत...