आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंत्यसंस्कार:जवान अर्जुन गांगुर्डे यांच्यावर कळमदरे येथे अंत्यसंस्कार

चांदवड21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

​​​​तालुक्यातील कळमदरे येथील भूमिपुत्र व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलात कार्यरत असलेले जवान अर्जुन लुकाराम गांगुर्डे (५१) यांचे ओडिशात सेवा बजावत असताना हृदयविकाराने निधन झाले. त्यांच्यावर शनिवारी (दि. ११) कळमदरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.

जवान अर्जुन यांचे वृद्ध वडील लुकाराम गांगुर्डे, आई वत्सलाबाई, भाऊ रावसाहेब व समाधान, पत्नी पुष्पा, मुलगा रोहन, मुलगी शिवानी यांनी फोडलेला टाहो उपस्थितांचाही हुंदका अनावर करणारा ठरला. सजवलेल्या रथातून जवान गांगुर्डे यांच्या निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ‘अमर रहे, अमर रहे...’, ‘भारतमाता की जय’, ‘वंदे मातरम‌्’च्या जयघोषाने परिसर दणाणून गेला होता. आमदार डॉ. राहुल आहेर, चांदवड बाजार समिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे, तहसीलदार प्रदीप पाटील, तालुका कृषी अधिकारी विलास सोनवणे, भाजप तालुकाध्यक्ष मनोज शिंदे, सरपंच नीलम जाधव आदींनी श्रद्धांजली अर्पण केली. देवळाली कॅम्प येथील जवानांनी अर्जुन गांगुर्डे यांना मानवंदना दिली. एन.डी.ए.मध्ये लेफ्टनंट पदावर सिक्कीम येथे कर्तव्यावर असलेला त्यांचा मुलगा रोहन याने त्यांच्या पार्थिवास अग्निडाग दिला.

बातम्या आणखी आहेत...