आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अखेरचा निरोप:शहीद सचिन मोरे पंचतत्वात विलीन, चीनच्या कुरापतीमुळे गलवान खोऱ्यात आले होते वीरमरण

मालेगाव10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • चीन अचानक सोडले होते नदीचे पाणी, सहकाऱ्यांना वाचवताना मोरेंना वीरगती झाली प्राप्त

भारत-चीन सीमेवरील गलवान खाेऱ्यात पुलाचे बांधकाम सुरू असताना चीनने रात्री अचानक नदीत पाणी सोडल्याने वाहून जाणाऱ्या सहकाऱ्यांना वाचवताना निमगुले साकूर (ता. मालेगाव) गावच्या जवानास वीरगती प्राप्त झाली होती. त्यांच्यांवर आज त्यांच्या मूळ गावी मालेगाव येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.  गावकऱ्यांनी शहिदाच्या अंतयात्रेसाठी रस्त्यावर फुलांच्या माळा पसरवल्या होत्या.

माेरे गेल्या 17 वर्षांपासून भारतीय लष्करात एसपी-115 मध्ये कार्यरत हाेते. त्यांचे पार्थिव पुणे येथे आणले जाणार आहे. तेथून नाशिक व मूळ गावी निमगुले येथे नेले जाईल. माेरे यांच्या पश्चात आई, वडील, दाेन भाऊ, पत्नी, दाेन मुली व सहा महिन्यांचा मुलगा आहे. गलवान खाेऱ्यात चीन रस्त्याचे बांधकाम करत आहे. भारतानेही नदीवर पुलाचे बांधकाम सुरू केले आहे. बुधवारी रात्री चीनने नदीत पाणी साेडले. या प्रवाहात भारताचे तीन जवान वाहून जात हाेते. माेरे यांनी थेट नदीत उडी घेतली. मात्र, दगडावर पडल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बातम्या आणखी आहेत...