आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करावैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या युवतीला एक्स बाॅयफ्रेंडने जबरीने दुचाकीवरुन नेत पालघरच्या जंगलात बलात्कार केला. ही गंभीर घटना उघडकीस आल्यानंतर खळबळ माजली आहे. महामार्ग बसस्थानकातून तरुणीला त्याने दुचाकीने पालघर येथे नेत हे कृत्य केले. ही घटना आज उघडकीस आली.
तरुणावर गुन्हा
संशयिताने तरुणीला आधी लिफ्ट देण्याचा बहाणा केला. परंतू नंतर संशयिताचा मनसुबा तरुणीच्या ध्यानात आला. पण तोपर्यंत उशीर झाला होता, त्याने पालघरच्या जंगलात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. याबाबतची तक्रार पीडित युवतीने मनोर पोलिस ठाण्यात दिली. ही घटना नाशिकमधून सुरु झाल्याने मुंबई नाका पोलिस ठाण्यात संशयित योगेश प्रकाश भुयाळ याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
युवतीसोबतच्या मित्राला धमकावले
पोलिसांनी दिलेली माहिती आणि पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, ती संगमनेरमध्ये एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेते. 10 ऑक्टोबर रोजी संगमनेर येथून बसने महामार्ग बसस्थानक येथे मित्रासोबत पालघरला जाण्यासाठी बसची वाट बघत होती. ओळखीचाच संशयित आरोपी योगेश भुयाळ त्या बसस्थानकात आला. त्याने तरुणीसोबत असलेल्या मित्राला निघून जाण्याची धमकी दिली. त्यामुळे मित्र भीतीने निघून गेला.
अन्..निर्जनस्थळीच
संशयिताने बळजबरीने तरुणीला दुचाकीवर बसवले. तिने आरडाओरड केली तेव्हा त्याने ठार मारण्याची धमकी दिली. जव्हारमार्गे पालघरकडे जाताना पालघरच्या जंगल परिसरात रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी त्याने दुचाकी उभी केली. रस्त्यावर वाहनांची वर्दळ कमी असल्याने त्याने ही संधी साधली.
नेमके काय घडले?
संशयिताने बळजबरीने हाताला पकडून तरुणीला फरफटत जंगलात नेले. दाट झाडीमध्ये संशयिताने युवतीचे तिच्याच ओढणीने हात पाय बांधले. त्यानंतर तोंडात रुमाल कोंबून तिच्यावर पाशवी अत्याचार केला.
कपाळावर दगडाने वार
तरुणीने झटापट करत प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तर संशयिताने जवळच पडलेल्या दगडाने तीच्या कपाळावर मारुन जखमी केले. रक्तबंबाळ अवस्थेत तरुणीला कुणास काही सांगीतले तर जीवे ठार मारण्याची धमकी देत गाडीवर बसवत पालघरला सोडून दिले.
चार -पाच दिवसांनी वाच्यता
पीडित तरुणीच्या कपाळावर झालेली जखमेबाबत आई - वडीलांनी विचारले असता मुलीसोबत काहीतरी बरे वाईट घडल्याचा संशय वडीलांना आला. मुलीला विश्वासात घेत विचारले असता ओळखीच्याच तरुणाने बलात्कार केल्याचे तिने सांगीतले.
पालघर पोलिसांत तक्रार
पीडित तरुणीने पालघर जिल्ह्यातील मनोर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. गुन्ह्याची सुरवात मुंबईनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतून झाल्याने हा गुन्हा टपालाने शहर पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.