आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाआरती:स्त्रीशक्तीची गाेदापूजा; महाआरतीतून आळवले "निर्मल पावन विशाल सुंदर अमुची गोदावरी‌’चे सूर‎

नाशिक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिखरस्वामिनी बहुउद्देशीय महिला‎ संस्था, नाशिक आणि निर्मल गोदागौरव‎ फाउंडेशन, नाशिक यांच्या विद्यमाने गोदाघाटावर‎ बुधवारी (दि. ८) सायंकाळी महिला दिनाच्या‎ निमित्ताने गोदावरीच्या महाआरतीची महाआरती‎ करण्यात आली. "निर्मल पावन विशाल सुंदर‎ अमुची गोदावरी’ हा मंजूळ सूर या आरतीतून‎ गुंजला. पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल यांनी‎ पौरोहित्य केले.

गोदावरी गौरव महिमा आणि‎ जलस्वच्छता यावर सुरेखा बोऱ्हाडे यांचे व्याख्यान‎ झाले. या महाआरतीसाठी ऑल इंडिया लीनेस‎ क्लब नाशिकरोड, रणरागिनी मराठा महिला‎ मंडळ, देशमुख समाज महिला मंडळ, साहित्य‎ परिषद संस्था, नाशिकरोड यांसह विविध संघटना‎ सहभागी हाेणार आहेत. माजी नगरसेविका संगीता‎ गायकवाड यांनी आयाेजन केले हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...