आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाला जाग:स्वच्छतेनंतर गाेदाघाट परिसर चकाचक; 2 टन कचरा संकलित

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहेे. गाेदाकाठ परिसरात सर्रासपणे कपडे, वाहने धुण्याचे प्रकार केले जात हाेते. या प्रकारावर दिव्य मराठीने ‘डी.बी.स्टार’च्या माध्यमातून प्रकाश टाकला. यात गाेदापात्रात हाेत असलेल्या प्रदूषणाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले हाेते. या वृत्ताची तातडीने दखल घेत पालिका प्रशासनाने रविवारी गाेदाघाट परिसरात स्वच्छता माेहीम राबवली.

या माेहिमेनंतर गाेदावरी नदी व परिसर स्वच्छ झाल्याने नागरिकांसह पर्यटकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे.गाेदावरीच्या पाण्याचे प्रदूषण राेखण्यासंदर्भात पालिका प्रशासनाने ठाेस उपाययाेजना करण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. मात्र याबाबतचे नियम, कायदे धाब्यावर बसवत नागरिकांकडून गाेदाकाठी कपडे, वाहने धुण्याचे प्रकार सुरू आहेत. या प्रकारामुळे नदीच्या प्रदूषणात वाढ हाेत असल्याने स्थानिक नागरिक, भाविकांसह पर्यटकांकडून नाराजी व्यक्त केली जात हाेती. या सर्व प्रकारावर डी. बी. स्टारने सचित्र वृत्त प्रकाशित करत गाेदा प्रदूषणाच्या प्रश्नाकडे पालिकेच्या अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले हाेते.

या प्रकाराची तातडीने दखल घेत रविवारी पालिकेच्या वतीने गाेदाघाट परिसरात स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. गाेदापात्रातील निर्माल्य, कचरा संकलित करण्यात आला. दरम्यान ही पालिकेच्या वतीने राबवली जाणारी स्वच्छता माेहीम ही केवळ एका दिवसापुरती मर्यादीत राहू नये, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

बातम्या आणखी आहेत...