आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दक्षिणेची गंगा’:गाेदावरीचा गीतप्रवाह आता सर्व शाळांमध्ये ; जनजागृतीसाठी पालिकेचे महत्त्वाचे पाऊल

नाशिक3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

निर्मल पावन विशाल सुंदर आमुची गाेदावरी सजीवांना संजीवन देण्या अवतरली भूवरी हर हर गंगे गंगे, गाेदावरी ||

कवयित्री सुरेखा बाेऱ्हाडे यांनी लिहिलेले आणि संजय गितेंनी संगीतबद्ध करतानाच त्यांच्यासह श्रावणी गिते यांनी गायलेले गाेदावरीचे हे गीत आता शहरातील सर्व शाळांमध्ये गुंजणार आहे. गोदावरी ही दक्षिणगंगा म्हणून ओळखली जाते. त्या गोदावरीबद्दल श्रद्धा, तिची स्वच्छता हा संस्कार शालेय वयातच व्हावा अशा विचारांनी नाशिक महानगरपालिकेने हे पाऊल उचलले आहे. शाळांच्या दैनंदिन परिपाठामध्ये याचा समावेश करण्यात आला आहे.

‘दक्षिणेची गंगा’ अशी ओळख असलेल्या गोदावरी नदीचे प्रदूषण नियंत्रणात ठेवण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. त्याचाच एक भाग म्हणून आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्या मार्गदर्शनाखाली १५ ऑगस्ट रोजी गोदा कृतज्ञता व संवर्धन गीताचे अनावरण कालिदास कलामंदिरात झाले.

...असे आहे गोदावरी गीत
या गोदागीतात सुरुवातीला प्रार्थना, नंतर ठसकेबाज पोवाडा आणि शेवटी प्रतिज्ञा असा सुरेख त्रिवेणी संगम आहे. विविधरंगी संगीताने गोदेच्या पाण्याची खळखळ, पक्ष्यांचे गुंजन यासह समर्पक शब्द आणि मधुर गायन गोदाप्रेमींना मोहित करून टाकणारे आहे.

बातम्या आणखी आहेत...