आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेदावरीची महाआरती:कलाकारांच्या हस्ते गाेदेची आरती

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गोदेचा खळखळाट, दिव्यांचा लखलखाट, आणि वैदिक मंत्रघोष अशा मंगलमय वातावरणात गोदावरी चित्रपटाच्या कलाकारांच्या हस्ते गाेदावरीची महाआरती करण्यात आली. नाशिकची अस्मिता आणि शहराची जीवनवाहिनी, समस्त नाशिककरांसाठी परमश्रद्धेय असणाऱ्या गोदावरीचे आशीर्वाद घेण्यासाठी (दि. ३) रोजी गोदावरी सिनेमातील प्रमुख कलाकारांनी गोदावरीची आरती केली.

या वेळी अभिनेता जितेंद्र जोशी, अभिनेत्री गौरी नलावडे, लेखक प्राजक्त देशमुख, लेखक, दिग्दर्शक निखिल महाजन, जिओ स्टुडिओजचे मराठी कंटेंट हेड निखिल साने, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, महंत अनिकेतशास्त्री देशपांडे, भक्ती चरणदास महाराज आदी मान्यवर उपस्थित होते, या संपूर्ण कार्यक्रमास नाशिककरांची माेठ्या संख्येने उपस्थिती हाेती. या आरतीसाठी प्रसाद गर्भे, विनायक चंद्रात्रे, संदीप मानकर, चिन्मय खेडेकर यांनी विशेष मेहनत घेतली.

बातम्या आणखी आहेत...