आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:वृंदावन येथून आलेल्या गाेवर्धन पर्वतांच्या शिलाचे आज इस्काॅन मंदिरात पूजन

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

इस्काॅन मंदिरात गाेवर्धन पूजा व गाेपाष्टमी बुधवारी (दि. २) साजरी केली जाणार आहे. यानिमित्त मंदिरात राधा-कृष्णांच्या विग्रहाला गाेपची सजावट करण्यात येणार आहे. तसेच यानिमित्त वृंदावन येथून आणण्यात आलेल्या गाेवर्धन पर्वताच्या शिलांचीदेखील पूजा हाेणार असून १०८ अन्नपदार्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात येणार आहे.

इस्काॅन मंदिरात दरवर्षी गाेवर्धन पूजन करण्यात येते. यंदा या उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयाेजन करण्यात आले आहे. सांयकाळी ७.३० वाजता मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू यांच प्रवचन हाेणार आहे. तसेच दामाेदरअष्टकाचे देखील पठण केले जाणार आहे. यानिमित्त मंदिरात गाेवर्धन पर्वताची प्रतिकृती तयार करण्यात आली आहेे. गाेवर्धन पर्वताच्या शिलेला भाविकांना प्रदक्षिणा घालता येणार आहे. या साेहळ्यासाठी इस्काॅन मंदिरात जय्यत तयारी करण्यात आलेली आहे. या साेहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आयाेजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...