आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उत्सवास प्रारंभ‎:इस्काॅन मंदिरात गाैर पाैर्णिमा महाेत्सव,‎ 2000 भाविकांना महाप्रसादाचे वाटप‎

नाशिक‎20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्कॉन मंदिरात मंगळवारी ( दि. ७)‎ गौर पौर्णिमा महोत्सवाचे आयाेजन‎ करण्यात आले. यानिमित्त मंदिराची‎ तसेच श्री राधा-कृष्णांच्या विग्रहांची‎ सजावट करण्यात आली हाेती. या‎ साेहळ्यानिमित्त २००० भाविकांना‎ महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.‎ गाैर पाैर्णिमा महाेत्सवानिमित्त‎ चैतन्य महाप्रभू यांनी मार्गदर्शन केले.‎ गौर पौर्णिमेनिमित्त मंदिराची तसेच श्री‎ राधा कृष्णांच्या विग्रहांची सुंदर‎ सजावट करण्यात आली होती.‎

सकाळपासून मंदिरात विविध‎ कार्यक्रम आयोजित करण्यात आले‎ होते. महोत्सवाला सकाळी ५‎ वाजताच्या मंगल आरतीपासूनच‎ सुरुवात झाली. त्यानंतर हरे कृष्ण‎ महामंत्र जप, दर्शन आरती, श्रीमद‎ भागवत प्रवचन झाले. कथेसाठी‎ इस्कॉन मुंबईहून श्रीमान व्रजविहारी‎ प्रभू आले होते. संध्याकाळी श्री श्री‎ गौर नीताई यांच्या विग्रहांचा पंचामृताने‎ अभिषेक करण्यात आला. श्रीमान‎ गोपालानंद प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू,‎ अद‌्भुतहरी प्रभू, लीलाप्रेम प्रभू‎ आदींनी परिश्रम घेतले.‎

बातम्या आणखी आहेत...