आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुगार अड्ड्यावर छापा:जुगार अड्ड्यावर छापा : 28 जणांना अटक

कोपरगाव शहर4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेना ठाकरे गटाच्या व्यापारी सेनेच्या तालुका प्रमुखांच्या शहरातील टाकळी फाटा धोंडिबानगर येथील इमारतीच्या टेरेसवर सुरू असलेल्या तिरट नावाच्या जुगार अड्ड्यावर पाेलिसांनी छापा टाकून जुगार खेळणाऱ्या २८ जणांना अटक केली. यात साडे तेवीस लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

धोंडिबानगर येथे योगेश मोरे याचे इमारतीचे टेरेसवर काही व्यक्ती जुगार खेळतात, अशी माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखा, नगर, शिर्डी पोलिस ठाणे व कोपरगाव पोलिसांनी तेथे छापा टाकला. शेखलाल शेख चाँद, शीतल लोहाडे रा. सावतानगर मालेगाव, विजय निमसे रा. रमाबाईनगर मनमाड, नंदू नजन रा. बनरोड राहाता, इम्रान मोमीन रा. जमदाडे चौक मनमाड, कलिम बागवान रा. इंदिरानगर, कोपरगाव, अश्पाक शेख रा.शांतीनगर मनमाड, नितीन शेजवळ रा. राजवाडा, लासलगाव, राहुल पाराशेर अशा २८ जणांना अटक केली.

बातम्या आणखी आहेत...