आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंडा:पेट्रोलपंप व्यवस्थापकास 27 हजारांचा गंडा; पंप व्यवस्थापकाच्या लक्षात हा प्रकार

नाशिक20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पेट्रोलपंपाच्या व्यवस्थापकाला बोलण्याच्या नादात गुंतवून नोटांच्या बंडलमधून २७ हजार रुपये काढून घेत परदेशी नागरिकाने गंडा घातल्याचा प्रकार द्वारका येथील बेला पेट्रोलपंप येथे उघडकीस आला. शनिवारी रकमेचा भरणा करताना पंप व्यवस्थापकाच्या लक्षात हा प्रकार आला. कुमार गोलानी यांच्या तक्रारीनुसार, द्वारका येथे बेला पेट्रोलपंप येथे कॅबिनमध्ये काम करत असताना परदेशी नागरिकासारखा दिसणारा व्यक्ती कॅबिनमध्ये आला.

त्याने आॅइलची बाटली खरेदी केली. देशातील सर्वात मोठी चलनी नोट कोणती आहे याची माहिती घेतली. त्याच्याकडे असलेल्या नोटा दाखवत यातील सर्वात मोठी नोट कोणती आहे याची माहिती द्या, असे सांगत गोलानी यांच्याकडून माहिती घेत असताना ५०० व २ हजारांच्या नोटाचे बंडल बघण्यास घेऊन त्यातून हातचलाखीने २७ हजार रुपये काढून घेतले.

बातम्या आणखी आहेत...