आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:नाशिक येथील रेहान अन् नमिराच्या घरी गणेशोत्सवाची धूम, श्रद्धा अन् गणरायावरील प्रेमापोटी धर्माच्या भिंती अाेलांडत करतात श्रींची अाराधना

नाशिक ( सचिन जैन)3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विघ्नविनाशक, सुखकर्ता असलेल्या लाडक्या बाप्पावर भाविकांची अमाप श्रद्धा असते. याच श्रद्धेपोटी गणेशाेत्सवात घराेघरी दहा दिवस गणरायाची माेठ्या उत्साहात अन् भक्तिभावाने अाराधना केली जाते. गणरायावरील श्रद्धा आणि प्रेमामुळे धर्माच्या भिंती ओलांडत नाशिक शहरातील दाेन मुस्लिम कुटुंबीय गेल्या पाच ते सहा वर्षांपासून अापल्या घरी गणेशाची विधिवत स्थापना करतात. विशेष म्हणजे दहाही दिवस अारती करत माेठ्या भक्तिभावाने गणेशाचे पूजन केले जाते. शहरातील या मुस्लिम कुटुंबीयांनी अापल्या या कृतीतून समाजासमाेर सामाजिक एकाेप्याचा अादर्श निर्माण केला अाहे.

वर्षभरापासून प्रतीक्षा असलेल्या लाडक्या गणरायाची २२ ऑगस्टला घराेघरी माेठ्या उत्साहात विधिवत स्थापना करण्यात अाली. घरी गणेशाची स्थापना करण्याचा असलेला एक वेगळा अानंद हॅपी काॅलनी परिसरात राहणाऱ्या शेख कुटुंबातही बघावयास मिळाला. हिंदू धर्मातील विविध देवदेवतांच्या पूजाअर्चाबद्दल रेहानला वेगळे अाकर्षण हाेते. यातून रेहान लहानपणापासूनच देव-देवतांची िचत्रे रेखाटत हाेता. चित्र रेखाटत असताना गणरायाबाबतही त्याला विशेष प्रेम निर्माण झालेे. याच प्रेमातून अन् गणरायावरील श्रद्धेतून गेल्या सहा वर्षांपासून अापल्या घरी विधिवत गणेश स्थापना करतात. विशेष म्हणजे दहा दिवस कुटुंबातील सर्व सदस्य मनाेभावे गणेशाची पूजा तसेच सत्यनारायणाची पूजादेखील करत असतात. गणरायाच्या अागमनामुळे घरात एका वेगळ्याच अानंदाची अनुभूती असल्याची प्रतिक्रिया नफिसा शेख हिने “दिव्य मराठी’कडे व्यक्त केली.

यूट्यूबवर गणरायाची आरती पाहून मनोभावे पूजा
अशोक मार्ग परिसरात राहणारी नमिरा पीरजादे ही तरुणीदेखील गेल्या तीन वर्षांपासून आपल्या घरी गणरायाची स्थापना करत आहे. लाडक्या गणेशाच्या आवडीतून तिने घरी गणपती बसवण्यास सुरुवात केली. तिच्या या आनंदात कुटुंबातील सदस्यदेखील मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात. विशेष म्हणजे गणपतीची आरती माहीत नसल्याने यूट्यूबवर पाहत नमिरा व तिचे कुटुंबीय गणरायाची आरती व मनोभावे पूजा करत असतात.
हॅपी कॉलनीतील शेख कुटुंबीय गणेशोत्सव साजरा करत आहेत.