आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये टोळी युद्ध भडकले:प्राणघातक हल्ल्यातील गंभीर जखमीचा उपचार सुरू असताना मृत्यू; दोन संशयित अटकेत

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोडमध्ये गुन्हेगारीने पुन्हा डोके वर काढले असून जुन्या भांडणाची कुरापत काढून कारमधील तीघांनी दुचाकीला धडक देत दुचाकीवरील एकावर कोयत्याने वार करुन गंभीर जखमी केले होते. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेला समीर पठाण वय 34 याचा उपचारा दरम्याण मृत्यू झाला. मृत्यूची माहिती मिळताच नाशिकरोड मध्ये तनावाचे वातावरण निर्माण झाले आहे. दि. 3 रोजी सौभाग्य नगर नाशिकरोड येथे हा प्रकार घडला होता. नाशिकरोड पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती आणि श्री उर्फ मोन वर्मा वय 27 रा. देवळाली गाव यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, मित्र समीर पठाण रात्री 11 वाजता मित्र समीर उर्फ मुस्तफा पठाण याच्यासोबत दुचाकी एमएच 15 एफके 3446 वरुन बसून वास्को चौक नाशिकरोड, येथून सौभाग्य नगरकडे पेट्रोल भरण्यास गेले होते. पेट्रोल भरुन देवळाली गावाकडे येत असतांना नाशिकरोड बाजुकडून येणारी गोल्डन रंगाची कार पाठलाग करत असल्याचे समजले. काही वेळात संशयित कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. धडज लागल्याने दुचाकीहून वर्मा आणि पठाण दोघे दुचाकीहून खाली पडले. कार मधून उतरलेले संशयित बाळा जाधव, दिनेश जाधव, मयुर बिडवे यांनी समीर पठाणवर हल्ला केला शिविगाळ करत कोयत्याने वार केले. या हल्ल्यात समीर गंभीर जखमी झाला. समीरला सोडवण्यास गेलेल्या वर्मावर संशयितांनी कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने उलटा कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली नाही. गंभीर जखमी अवस्थेत पठाणला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. हल्ला केल्यानंतर संशयित त्याच कारमधून फरार झाले होते. नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. वरिष्ठ निरिक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

टोळी युद्धाची किनार

संशयितांनी जुन्या भांडणाची कुरापत काढून समीर वर हल्ला केला. या हल्ल्यात समीरचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. संशयितांवर यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. दोघांना अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर नाशिकरोड परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

बातम्या आणखी आहेत...