आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Gang Who Stole Cars And Sold Them In Nashik Jailed In Gujarat State; Out Of Three Arrests, One Is Absconding, Action Of Nashik Crime Branch

गुजरातेत वाहनचोरी, नाशिकमध्ये विक्री:पोलिसांनी ठोकल्या टोळीला बेड्या; 3 संशयित अटकेत, एक पसार

नाशिक13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात राज्यातून वाहन चोरी करुन शहरात विक्री करणारी टोळी जेरंबद करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट २ च्या पथकाने कारसह तीन संशयितांना अटक केली. सोमवारी आडगाव जकात नाका येथे पथकाने ही कारवाई केली. पिंकल श्रावण पाडवी, जसवंत रमेश वसावा, रुस्तम नगीनभाई वसावा, असे या कारचोरी करणाऱ्या टोळीतील संशयिताचे नावे आहे. एक साथीदार मोहन वासवा फरार झाला.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुन्हे शाखेचे पथक गस्त करत असतांना गुजरात येथून कार विक्री करण्यासाठी शहरात येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने आडगाव जकात नाका येथे सापळा रचला. माहितीच्या अधारे संशयित कार जकात नाक्यासमोर रस्त्याच्या कडेला थांबलेली दिसली. काममध्ये चार इसम बसलेले आढळून आले. पथकाने कारला घेरून तीघांना ताब्यात घेतले. एक संशयित झटापट करुन पळाला. कारच्या कागदपत्राबाबत विचारणा केली असता त्यांना उडवाउडवीचे उत्तरे दिली. वरिष्ठ निरिक्षक आनंद वाघ, गुलाब सोनार, राजेंद्र घुमरे, शंकर काळे, यांच्या पथकाने ही कारवाई केली.

गुजरात राज्यातील नसारपूर येथून कार चोरी

नसारपुर येथून या टोळीने कार चोरी करुन ते शहरात आले. येथील काही अोळखीच्या मित्रांच्या ओळखीने ते कार विक्री करणार होते. असे तपासात निष्पन्न झाले. यापुर्वी या टोळीने कार विक्री केल्याचा संशय असून पथकाकडून तपास सुरु आहे. फरार संशयिताचा शोध सुरु आहे.

बातम्या आणखी आहेत...