आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिंहस्थ कुंभमेळ्याची झाली आठवण:नाशिकमध्ये गंगापूजनाचा सोहळा गुरू अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते रामकुंडावर उत्साहात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्ग व पुरोहित संघाच्या वतीने गत 50 पेक्षा अधिक वर्षांची परंपरा असलेला गंगापूजनाचा सोहळा मोठया मंगलमय व भावपूर्ण वातावरणात, गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या हस्ते रामकुंडावर संपन्न झाला. शुक्रवार या सोहळ्याने उपस्थितांना सिंहस्थ कुंभमेळ्याचीच आठवण करून दिली.

10 दिवसांचा उत्सव

जेष्ठ महिन्याच्या शुक्ल प्रतिपदेपासून दशमी असे दहा दिवस भारतभर गंगा दशहरा उत्सव साजरा केला जातो.या वर्षी 31 मे ते 9 जून पर्यंत गंगा दशहरा उत्सव साजरा केला जात आहे. यावेळी गुरुंमाउली अण्णासाहेब मोरे म्हणले की, भारतात नद्यांना आम्ही मातेचा सन्मान दिला आहे. नदी जीवसृष्टीला सजीवत्व देते.पवित्रता, शुद्धता, निर्मळता, प्रक्षालन, परिष्कार, संयम, परोपकार, पापमुक्ती या सर्वांचं प्रतीक आपण गंगा गोदा मातेस मानतो. या मातेशी आपले मानसिक, अध्यात्मिक, सांस्कृतिक, वैज्ञानिक दृढ भावबंध युगानुयुगे घट्ट रुजले आहेत म्हणूनच आज जीवसृष्टीला नवचैतन्य देणाऱ्या गंगा गोदावरी मातेचे यथाससांग पूजन करून आपण सर्व तिचा सन्मान करत आहोत. गुरुमाऊलींनी सांगितले.

सेवेकरी सोहळ्यात सहभागी

दरवर्षी प्रमाणे गंगापूर रोड येथील श्री स्वामी समर्थ केंद्रातून गंगाजल कळशाची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणूक मार्गांवर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या. हाती भगवे ध्वज घेऊन महिला पुरुष सेवेकरी स्वामींनामाचा जप करत रामकुंड परिसरात पोचले आणि मुख्य गंगापूजन सोहळ्यात सहभागी झाले. पुरोहित संघांचे सतीश शुक्ल आणि सहकाऱ्यांनी राष्ट्रकल्याण, राष्ट्ररक्षण, सर्व जीवसृष्टीचे कल्याणाचे साकडे गुरुमाऊली व उपस्थित सेवेकऱ्यांच्या वतीने गोदामाईस घातले आणि मंत्रघोषात यथासांग गंगापूजन सर्वांकडून करून घेतले.याप्रसंगी खासदार हेमंत गोडसे, आमदार सीमा हिरे, महापालिका आयुक्त रमेश पवार, वत्सलाखैरे, महेश हिरे आदी उपास्थित होते.

गोदामाईने कृपा करावी - मोरे

गोदामाईच्या माध्यमातून पर्जन्यराजाने कृपा करून सर्व जीवसृष्टीला नवचैतन्य द्यावे, शेतकरी सुखी, संपन्न व्हावा आणि शेतकरी राजाच्या आत्महत्या थांबाव्यात अशीच आपली मनोकामना गोदामाईकडे व्यक्त करत आहोत असे सांगून ती आपली हाक ऐकून निश्चितच आपली इच्छा पूर्ण करेल, असा विश्वासही गुरू मोरे यांनी व्यक्त केला.

बातम्या आणखी आहेत...