आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभाल दुरुस्तीचा भार येणार‎:गंगापूर मलनिस्सारण केंद्र, मुकणे‎ पाणीयोजना, महापालिकेच्या माथी‎

नाशिक‎21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक‎ असताना तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध‎ योजनांपोटी ३२ कोटी रुपयांचा वार्षिक भार येत‎ असताना, आता मुकणे धरण पाणी पुरवठा‎ योजना व गंगापूर मलनिस्सारण केंद्राच्या‎ देखभाल दुरुस्तीचा भार देखील नाशिक‎ महापालिकेवर येत आहे. काँग्रेस सरकारच्या‎ सत्ता काळात केंद्र सरकारने जवाहरलाल नेहरू‎ नागरी पुनरुथान योजनेअंतर्गत स्थानिक स्वराज्य‎ संस्थांसाठी राबविलेल्या विविध योजनांच्या‎ देखभाल व दुरुस्तीचा कालावधी मार्च अखेर‎ संंंपल्यामुळे ही वेळ आली आहे.‎ महापालिका व जिल्हा परिषद या स्थानिक‎ स्वराज्य संस्थांना केंद्र व राज्य शासनामार्फत‎ विविध योजनांमधून निधी येत असतो.‎ भाजपाच्या सत्ता काळात सध्या अमृत‎ योजनेअंतर्गत महापालिकांना निधी दिला जात‎ आहे. प्रामुख्याने रस्ते, वीज, पाणी‎ मलनिस्सारण या योजनांसाठी २०० कोटीं पेक्षा‎ अधिक खर्च येत असतो.

बातम्या आणखी आहेत...