आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलींचे अपहरण करणाऱ्यांना ठोकल्या बेड्या:सीसीटीव्ही फुटेजमध्ये प्रकार कैद! किडनॅप करून मुलींच्या विक्रीचा संशय

नाशिक9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यात लहान मुलीचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात ओझर पोलिसांना यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे.

15 दिवसांत 2 घटना

नाशिक जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत ओझर येथून दोन मुली अपहरण झालेच्या धक्कादायक घटना समोर आल्या होत्या. जिल्ह्यात लहान मुलीचे अपहरण करून परराज्यात विकणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात यश आले आहे. नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांनी ही मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी केलेल्या या कामाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. दरम्यान पोलिसांनी केलेल्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे बोलले जात आहे.

नागरीकांत भीती

नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक सचिन पाटील यांच्या सहकार्याने ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. गुजरात आणि मध्यप्रदेशमध्ये गेलेल्या महाराष्ट्रातील पोलिसांच्या पथकांनी त्यांना अटक केले आहे. ओझर मध्ये 2 महिन्यात 2 मुलींचे अपहरण झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील ओझरमधीलच एक महिला पैशांसाठी हे काम करतम असल्याचे उघडकीस आले आहे.

सीसीटीव्ही फुटेज लागले हाती

दरम्यान त्या महिलेकडून अपहरण करतानाचा व्हिडिओ दै. दिव्य मराठीच्या हाती लागला आहे. ओझर पोलिस निरीक्षक अशोक रहाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस गुन्हे शोध पथकाचे अनुपम जाधव किशोर अहिरराव, राजेंद्र डबाळे जितेंद्र बागुल रावसाहेब मोरे, उजवला पानसरेमोठ्या शिताफीने ही कारवाई केल्याने कौतुक होत आहे. 4 आरोपींना ताब्यात घेण्यात नाशिक जिल्ह्यातील ओझर पोलिसांना यश आले. यामध्ये 2 महिला आरोपी आहेत तर 2 पुरुष आरोपी असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

अल्पवयीन मुलींना फुस

दरम्यान पोलिसांनी याला ऑपरेशन मुस्कान म्हणून नाव दिले होते. यामध्ये अल्पवयीन मुलींना फूस लावून विकणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. ज्या मुलींचे अपहरण करण्यात आले होते. यामध्ये दहा ते बारा वयोगटातील मुलींचा समावेश होता त्यामुळे पालकामध्ये भितीचे वातावरण होते.

मध्यप्रदेश, गुजरातेत कारवाई

संशयितांकडून पंचवटी, सातपूर, फुलेनगर इथल्या देखील मुली फूस लावून पळवून नेल्याचे कबूल करण्यात आले आहे. ओझर गुन्हे शोध पथक पाच दिवस गुजरात आणि मध्य प्रदेश मध्ये तळ ठोकून होते यामध्ये त्यांना यश आले आहे.

बातम्या आणखी आहेत...