आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामित्राच्या लग्नासाठी नाशिकमधून उत्तर प्रदेशात गेल्यानंतर हाॅटेलमध्ये झालेल्या गॅस गळतीमुळे दोन तरुण भाजले. यातील एकाचा त्याच दिवशी तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान काल मृत्यू झाला असून याबाबत आज अधिकृत माहीती प्राप्त झाली आहे.
प्रकाश सुधाकर दाते (30) व बादशाह परवेझ शेख (26)असे मृतांचे नाव असून ते सातपूर परिसरात राहत हाेते. सातपूर येथील हाॅटेल भाेलेनाथच्या संचालकांच्या मुलाचे लग्न उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथे हाेते. या लग्नासाठी सातपूर मधील सात युवक चारचाकी वाहनाने गेले हाेते.
8 तारखेला लग्न साेहळा आटाेपल्यानंतर ते दर्शनासाठी लखनऊ येथे गेले. तेथे त्यांनी हाॅटेलची रुम बुक करुन तेथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला हाेता. रात्रीच्या वेळी हाॅटेलच्या खालीच असलेल्या बिर्याणी काॅर्नर येथे प्रकाश व बादशाह हे दाेघे मित्र बिर्याणी खाण्यासाठी गेले हाेते. उर्वरीत पाच मित्र हाॅटेलच्या वरती असलेल्या रूम मध्ये झाेपण्याची तयारी करत हाेते. याचवेळी बिर्याणी काॅर्नरच्या हाॅटेलमध्ये गॅस गळती झाल्याने क्षणार्धात आगीने भडका घेतला.
यात प्रकाश दाते हा 100 टक्के भाजल्याने त्याचा त्या दिवशीच मृत्यू झाला. तर बादशाह शेख हा 70 टक्के भाजल्याने त्याच्यावर लखनऊ येथील हाॅस्पिटल मध्ये उपचार सुरू हाेते. या घटनेनंतर जखमी बादशाहाच्या कुटुंबियांनी तात्काळ लखनऊ कडे धाव घेऊन मुलाला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, रविवारी (दि. 18) उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. साेमवारी त्याच्यावर सातपूर येथील रजविया मशिदीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
या घटनेतील मृत प्रकाश दाते हा सातपूर परिसरातील बॅंकेत सुरक्षा रक्षकाची नाेकरी करत हाेता. त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, दोन मुले, बहीण असा परिवार आहे. तर बादशाह शेख हा अविवाहीत असून त्याचे वडील परवेझ यांचा सातपूर परिसरात पान- सुपारीचा हाेलसेलचा व्यवसाय करतात.
दाेन्ही मित्रांचा लखनऊला जाण्याचा होता आग्रह
लग्न साेहळा आटाेपल्यानंतर आम्ही प्रतापगडहून मार्गात येणाऱ्या पर्यटनस्थळांसह धार्मिक स्थळांचे दर्शन करत येणार हाेताे. मात्र, प्रकाश व बादशाह या दाेन्ही मित्रांनी लखनऊला जाण्याचा आग्रह केल्यामुळे आम्ही लखनऊला गेलाे आणि तेथे ही घटना घडली. - निवृत्ती बल्लाळ, सहप्रवाशी तथा वाहनमालक.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.