आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक- केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत सरकारने नैसर्गिक वायूच्या किंमती निश्चित करण्याच्या नव्या सूत्राला मान्यता दिल्यामुळे घरगुती वापराच्या पाईप्ड नॅचरल गॅस व काॅम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किंमती कमी होणार असल्याने महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड या शहरी गॅस वितरण कंपनीने नाशिक व धुळे परिसरांत या भौगोलिक भागांत घरगुती वापराच्या पाईप्ड गॅसच्या (पीएनजी) किरकोळ विक्री किंमतीत कपात केली आहे.
आता नवीन दराप्रमाणे पीएनजीची किंमत रू 5.50 प्रति एससीएम् ने कमी होईल तर काॅम्प्रेस्ड नॅचरल गॅसच्या किंमती रु. 6 प्रति किलो ग्रॅम या दराने कमी केल्या आहेत. यानुसार, पीएनजीची सुधारित किंमत रू49.50प्रति एससीएम् होईल (पूर्वीची किंमत रु. 55.00 प्रति एससीएम्) तर सीएनजीची सुधारित किंमत रू 90.50 प्रति किलो ग्रॅम (पूर्वीची किंमत रू. 96.50 प्रति किलो ग्रॅम) होईल. ही दरकपात लागू करण्यात आली आहे.
ही दरकपात झाल्यावर एमएनजीएलचे सीएनजी आत्ताच्या पेट्रोल व डिझेलच्या किंमतीच्या तुलनेत सुमारे 48% आणि 25% बचत करेल. यातील 48% बचत ही प्रवासी वाहतुकीच्या वाहनांसाठी तर 25% बचत ही ऑटोरिक्षांसाठी असेल.
एमएनजीएलची ही दरकपात घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या खरेदी किंमतीत कपात झाल्याने करण्यात आली असून एमएनजीएलने या कपातीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे.
या दरकपातीनंतर घरगुती वापराच्या नैसर्गिक वायूच्या पीएनजीच्या किंमती ह्या एलपीजी सिलिंडरच्या किंमतीच्या तुलनेत 20% ने स्वस्त झाल्या आहेत.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेडने घरगुती वापराच्या पीएनजीचेही दर कमी केल्याने नाशिक व धुळे परिसरातील असंख्य ग्राहकांना फायदा होईल व त्यामुळे एलपीजी सिलिंडरच्या सध्याच्या किंमतीच्या तुलनेत बचत होईल.
नैसर्गिक वायूच्या खरेदी किमतीत घट झाल्याने सीएनजी व पीएनजीच्या दरात ही कपात करण्यात आली असून कंपनीने कमी झालेल्या गॅसच्या किमतीचा फायदा ग्राहकांना देण्याचा निर्णय घेतला आहे, असे यासंदर्भात महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनीकडून सांगण्यात आले.
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड हा गॅस ॲथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेड आणि भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांचा संयुक्त उपक्रम असून त्यामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड मार्फत महाराष्ट्र सरकारचा सहसमभाग आहे. महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड ही कंपनी पुणे, पिंपरी-चिंचवड तसेच हिंजवडी, चाकण आणि तळेगाव यासह महाराष्ट्रातील धुळे, नाशिक व सिंधुदुर्ग जिल्हा, गुजरातमधील वलसाड (आधीचे अधिकृत क्षेत्र वगळता) आणि कर्नाटकातील रामनगर या भौगोलिक क्षेत्रांतील एक प्रमुख शहर गॅस वितरण कंपनी आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.