आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

छात्रालयाची उभारणी:गायत्री परिवाराने 28 लाखांच्या निधीतून उभारले कन्या छात्रालय

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गायत्री युगनिर्माण याेजना ट्रस्ट परिवाराने सुरगाणा तालुक्यातील कुकुडणे येथे २८ लाखांच्या निधीतून कन्या छात्रालयाची उभारणी केली आहे. यामुळे पं. जवाहरलाल नेहरू प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील २२० विद्यार्थिनींना निवासाची उत्तम सुविधा उपलब्ध झाली आहे. याशिवाय, डांग सेवा मंडळाच्या आदिवासी भागातील उंबरठाण, सुळे, वारे, शिंदे, आंबेगण, धांग्रीपाडा, कुकुडणे येथील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना माेफत ११ हजार वह्यांचे वाटपही केले गेले.

माँ भगवतीदेेवी शर्मा कन्या छात्रालयाच्या या लाेकार्पण साेहळ्याच्या अध्यक्षस्थानी डांग सेवा मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती हेमलता बीडकर हाेत्या. प्रमुख अतिथी म्हणून हसमुखभाई लुहार, डाॅ. चिन्मय पंड्या आणि गायत्री परिवाराचे खान्देश झाेनचे उपप्रमुख एन. के. उपाध्याय उपस्थित हाेते. सूरगाणा तालुक्यातील अनेक पाडे, गावे ही दुर्गम भागात असून मुलांना शिक्षणासाठी उत्तम सुविधा मिळाव्यात याकरिता गायत्री परिवाराकडून सातत्याने विविध सुविधा उभारण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याचाच भाग म्हणून हे कन्या छात्रालय उभारण्यात आले आहे. यावेळी वृक्षाराेपणही करण्यात आले.

बातम्या आणखी आहेत...