आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये होणार गीता जयंती उत्सव:शनिवारी रंगणार विविध धार्मिक कार्यक्रम, भाविक मोठ्या संख्येने असणार उपस्थित

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आचार्य प्रवर मंहत कै. नागराज बाबा व प.पू. अनंतराज बाबा महानुभाव यांच्या प्रेरणेने व आचार्य प्रवर मोठेबाबा अंकुळनेरकर (पुणे ) यांच्या प्रेरणेने भगवान श्रीकृष्णद्वारा निरोपित श्रीभगवत गीता जयंती उत्सव शनिवार, 3 डिसेंबरला रोजी सातपुतेपाडा जुनोठी,येथे साजरा होणार आहे.

कोरोनानंतर उत्साही वातावरण

या सोहळ्यात नाशिकच्या जिल्हाभरातील भाविक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. गेले दोन वर्ष करुणामुळे सर्व सण उत्सवावर निर्बंध होते मात्र यंदा हे सर्व निर्बंध हटल्याने यंदा गीताचे जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या दृष्टीने शहरासह जिल्ह्यात ठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रम देखील रंगणार असून त्यादृष्टीने नियोजन करण्यात आले आहे.

या जयंती सोहळ्यास आचार्य प्रवर श्री नागराज बाबा ( जि. छत्रपती संभाजीनगर ) आचार्य प्रवर महंत साळबाबा (धुळे ) आचार्य प्रवर महंत अंकुळेकर बाबा (भुवन ) आचार्य महंत मनोहर शास्त्री सुकेणेकर ( सुकेणे ) उपस्थित राहणार आहेत.

असे असणार कार्यक्रम

  • याप्रसंगी देवास मंगल स्नान, श्रीमद् भागवत गीता पारायण,
  • ध्वजारोहण, प्रवचन आरती,
  • उपहार, शोभायात्रा -मिरवणूक, सत्कार समारंभ, दीक्षाविधी,
  • प्रवचन - कीर्तन आदि धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.

रायकीय नेते असणार उपस्थित

या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून पांडुरंग बाबा गायकवाड, केंद्रीय मंत्री डॉ. भारतीताई पवार, पालकमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार सुनील भुसारा, हिरामण खोसकर, बाळासाहेब सानप, दिनकर अण्णा पाटील, भास्करराव गावित, दत्ता गायकवाड, प्रकाशशेठ घुगे प्रभाकर आप्पा भोजने, प्रकाशशेठ ननावरे, आदी उपस्थित राहणार आहेत.

भाविकांना आवाहन

या कार्यक्रमास भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे ,असे आवाहन समस्त ग्रामस्थ सातपुते पाडा, जुनोठी, गणेशवाडी पंचक्रोशीतील सदभक्त, नाशिक, पालघर महाराष्ट्र, गुजरात, दादरा नगर हवेली यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...