आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिबिरात 138 जणांची कॅन्सर तपासणी:काळाराम संस्थानच्या वतीने महाआराेग्य शिबिर

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

श्री काळाराम संस्थानच्या वतीने आयाेजित महाआराेग्य शिबिरात साेमवारी (दि. २) १३८ नागरिकांची माेफत कॅन्सर तपासणी करण्यात आली. काळाराम संस्थानच्या वतीने ४ जानेवारीपर्यंत आराेग्य तपासणी शिबिर हाेत आहे. साेमवारीच्या पहिल्या दिवशी नामकाे हाॅस्पिटलच्या सहकार्याने झालेल्या शिबिरात १३८ नागरिकांनी तपासणी तज्ज्ञ डाॅक्टरांनी केली. तसेच प्रश्नाेत्तराच्या माध्यमातून त्यांच्या शंकांचे निरसनदेखील करण्यात आले. या शिबिराचे उद‌्घाटन जिल्हा व सत्र न्यायाधीश उमेशचंद्र माेरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंदिराचे विश्वस्त मंदार जानाेरकर, शुभम मंत्री, एकनाथ कुलकर्णी, धनंजय पुजारी, मंगेश पुजारी आदी उपस्थित हाेते.

आज नेत्रराेग तपासणी मंगळवारी (िद. ३) माेफत सर्व राेगनिदान शिबिर व नेत्रराेग तपासणी करण्यात येणार आहे. गरजूना चष्मेदेखील वाटप केले जाणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...