आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महामेळावा:विधिसेवा व प्रशासनातर्फे आज शासकीय योजनांचा महामेळावा

नाशिक23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा विधिसेवा प्राधिकरण व प्रशासनातर्फे शासकीय योजनांचा महामेळावा रविवारी (दि. ६) सकाळी १० वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालयात हाेत असल्याची माहिती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणाचे सचिव शिवाजी इंदलकर यांनी दिली.

या महामेळाव्यात जिल्हाधिकारी कार्यालय, महानगरपालिका, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, टपाल विभाग, बँक अशा सर्व शासकीय कार्यालयांनी सहभाग नोंदविलेला आहे. यातून लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा प्रत्यक्ष लाभ दिला जाणार असून योजनांची माहिती देणारे स्टाॅलही या ठिकाणी लावले जाणार आहेत. महामेळाव्यास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. डी. जगमलानी, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हा न्यायाधीश व्ही. एस. कुलकर्णी, जिल्हाधिकारी डी. गंगाथरन, महापालिका आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पोलिस आयुक्त जयंत नाईकनवरे, जिल्हा परिषदेच्या सीईआे आाशिमा मित्तल, जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप उपस्थित राहणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...