आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मिरवणूक:घोटीत खंडोबा‎ यात्रौत्सव , तीन दिवस‎ विविध कार्यक्रम‎

घोटी2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

रामरावनगर येथे‎ खंडेराव महाराज यात्रोत्सव‎ सुरू झाला असून यानिमित्त‎ विविध धार्मिक कार्यक्रमांचे‎ आयोजन केले आहे. शुक्रवारी‎ हरी भजन कार्यक्रम, शनिवारी‎ (दि.४) रात्री सप्तशृंगी गायन‎ पार्टी, गिरणारे यांचे खंडोबाची‎ गाणी हा कार्यक्रम होणार आहे.‎ रविवारी (दि.५) दुपारी १२ ते ५‎ या वेळेत शिवमल्हार‎ मित्रमंडळाच्या वतीने‎ महाप्रसादाचे आयोजन केले‎ आहे. दुपारी ३ ते ५ या वेळेत‎ खंडेराव महाराजांच्या चांदीच्या‎ मूर्तीची बैलगाडीतून घोटी‎ शहरातून मिरवणूक काढणार‎ आहे. रात्री ९ ते १२ या वेळेत झी‎ टॉकीज फेम विनोद सम्राट‎ बालकीर्तनकार हभप चैतन्य‎ महाराज राऊत (आळंदीकर )‎ यांचे हरिकीर्तन होणार आहे.‎ यासाठी संतोष दगडे व कार्यकर्ते‎ परिश्रम घेत आहेत.‎

बातम्या आणखी आहेत...