आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकचे घुटे बाबा यांचे निधन:हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू

नाशिक17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्राथमिक शिक्षक, जिल्हा परिषदेत गटविकास आधिकारी ते अध्यात्मिक गुरू असा प्रवास करणारे, धार्मिकतेला विज्ञानाची जोड देत अनेक भक्तांचे संकट दूर करणारे अध्यात्मिक गुरू श्री.के.एल.घुटे बाबा यांचे शनिवारी वयाच्या 95 व्या वर्षी दुःखद निधन झाले. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने रुग्णालयात उपचार घेत असताना त्यांची प्राणज्योत मालवली.

प्राथमिक शिक्षक ते गटविकास आधिकारी म्हणून इगतपुरी तालुक्यातील आदिवासी भागात तब्बल ४० वर्ष ज्ञान दानाचे कार्य केल्यानंतर श्री.के.एल.घुटे बाबा हे पंचवटी येथे स्थायिक झाले. सेवानिवृत्ती नंतर साहित्य लिखाण सुरू असताना त्यांनी नवनाथ संप्रदायाचा अभ्यास केला. त्यात त्यांनी अध्यात्माला विज्ञानाची जोड देत अनेक व्यक्तींना संकटातून बाहेर कसे पडायचे याचा मार्ग दाखविला. यावेळी अनेक व्यक्तींना दैवी शक्तीची अनुभूती होत गेल्याने बाबांना गुरू मानले. अशा प्रकारे हजारो भक्तांचे प्रश्न सुटत गेल्याने मोठ्या प्रमाणात भक्त परिवार जोडला गेला.

बाबांनी कानिफनाथ महाराज मार्गदर्शन केंद्र सुरू केले. कोणतेही पैसे अथवा बुवाबाजी न करता मोफत मार्गदर्शन आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत सुरूच ठेवले होते. कुटुंब उभे करण्यापासून, नोकरी, उद्योग, व्यवसाय, शिक्षण, लग्न, मुले बाळे, घर, इतर अडचणी असे सर्वच प्रश्न भक्त परिवाराचे सोडविल्याने अनेकांनी वेगवेगळी अनुभूती घेतली. स्वतः साधे राहणीमान व छोटेसे घर असताना भक्तांना मात्र मोठे केले. त्यामुळे अध्यात्मिक गुरू म्हणून बाबा सर्वांचे आदर्श स्थान ठरले.

त्यांनी विविध विषयांवर अनेक ग्रंथ व पुस्तके लिहिली. हे साहित्य भक्त परिवाराला मोफत दिले जात होते. त्यांच्या निधनाने भक्त परिवारावर शोककळा पसरली. मंगळवारी सायंकाळी पंचवटी येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पच्यात एक मुलगी, सून, दोन नातवंडे असा परिवार आहे. नाशिक शहर जिल्ह्याशहश मराठवाडा विधर्भ भागात त्यांचा फक्त परिवार मोठ्या प्रमाणात होता. सामाजिक धार्मिक कार्यात त्यांचा मोठा प्रमाणात सहभाग असायचा.

बातम्या आणखी आहेत...