आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उपक्रम:20 गरजू विद्यार्थ्यांना सायकल भेट‎

नाशिक‎6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाळेत जाण्यासाठी अडचण‎ येणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांसाठी‎ अमेरिकास्थित महाराष्ट्र मराठी‎ मंडळाच्या वतीने पेडल टू सक्सेस‎ उपक्रम राबविण्यात येत आहे. या‎ उपक्रमांतर्गत चेहेडी येथील एस. के.‎ पांडे महाविद्यालयातील वीस‎ विद्यार्थिनींना सायकल वाटप‎ करण्यात आले.‎ घरापासून शाळा दूर असल्याने‎ मुली बऱ्याचदा शिक्षणाच्या‎ प्रवाहातून बाहेर पडतात. त्यामुळे‎ विद्यार्थिनींची शाळेतून गळती हाेत.‎

याचा समाजाव्यवस्थेवर देखील‎‎‎‎‎‎‎‎‎‎ गंभीर परिणाम हाेता. शिक्षणाच्या‎ प्रवाहात मुली कायमस्वरूपी‎ रहाव्या, त्याच्या शिक्षणात‎ काेणत्याही प्रकारचा अडथळा‎ निर्माण हाेवून नये यासाठी महाराष्ट्र‎ मराठी मंडळाच्या वतीने पुढाकार‎ घेण्यात आला. मंडळाच्या वतीने‎ गरजवंत मुलींना २० सायकलचे‎ वाटप करत त्यांचा घर ते सायकल‎‎‎‎‎‎‎‎‎‎ हा प्रवास साेयीस्कर केला आहे.‎ मंडळाच्या डाॅ. साेनाली काळभाेर,‎ डाॅ. स्मिता ठाणगे, डाॅ. चंद्रशेखर‎ ठाणगे, मालिनी आैटे, इंदुमती‎ जाेशी, प्राथमिक विद्यामंदिराचे‎ मुख्याध्यापक बाळासाहेब वाकचाैरे,‎ महाविद्यालयाच्या प्राचार्या एस. के.‎ बाेराडे आदींसह शिक्षक विद्यार्थिनी‎ उपस्थित हाेते.‎

बातम्या आणखी आहेत...