आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:पेठरोडला भरधाव जाणाऱ्या‎ टेम्पोने चिमुकलीला चिरडले‎, परिसरात तणावाची स्थिती‎

प्रतिनिधी | नाशिक‎एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भरधाव वेगात जाणाऱ्या टेम्पोने‎ चिरडल्याने ८ वर्षीय मुलगी जागीच ठार‎ झाली. सोमवारी (दि.‎ १) वज्रेश्वरीनगर,‎ पाटाजवळ एमईसीबी‎ ऑफिसच्या समोर‎ दिंडोरी रोड येथे‎ सायंकाळी ५ वाजता‎ अपघात घडला.‎ अपघातानंतर संतप्त नागरिकांनी टेम्पोची‎ तोडफोड केली.‎

पोलिसांनी दिलेली माहिती आणि शबाना‎ खान रा. अवधुतवाडी यांनी दिलेल्या‎ तक्रारीनुसार, सायंकाळी ५ वाजता भाची‎ जोया सलिम शेख वय ८ रा. अवधुत वाडी‎ हीला टेम्पोने धडक देत चाक तीच्या‎ डोक्यावरुन गेल्याने दिली. ती जागीच ठार‎ झाली.‎ जमावाला पांगवण्यासाठी शीघ्र कृती‎ दलाचे जवान, पंचवटी पोलिस ठाण्याचे‎ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.‎ वरीष्ठ निरीक्षक अनिल शिंदे यांनी‎ नातेवाईक आणि जमावाला समजून सांगत‎ चालकावर कठोर कारवाई करण्याचे‎ अश्वासन दिले. टेम्पो चालक रुस्तम‎ दत्तात्रय टेंगसे रा. हिरावाडी याच्या‎ विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.‎