आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षा सुनावली:मुलीचे अपहरण करून बलात्कार; आरोपीला 10 वर्षे सश्रम कारावास

नाशिक10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१४ वर्षीय मुलीला तिच्या भावाला ठार मारण्याची धमकी देत तिचे अपहरण करून बलात्कार करणाऱ्या आरोपीला न्यायालयाने १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. विशेष न्यायालयाचे न्यायाधीश डी. डी. देशमुख यांनी ही शिक्षा सुनावली. आकाश कन्हैया लोणारे (२०) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, ९ नोव्हेंबर २०१८ राेजी सिन्नर येथील लोंढे गल्लीत राहणारा आरोपी आकाश लोणारेने पीडित मुलगी शाळेत जात असताना तिचे अपहरण केले.

मोहदरी शिवारात एका हाॅटेलमध्ये नेत तिला धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. तिचे अपहरण करून गुजरात येथे मंदिरात बळजबरीने लग्न करत येथेही अत्याचार केले. सिन्नर पोलिस ठाण्यात पोक्सोंंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयाने त्यास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. विशेष सरकारी वकील अॅड. दीपशिखा भिडे यांनी १० साक्षीदार तपासले.

बातम्या आणखी आहेत...