आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकांद्याला ५०० ते १००० रुपये क्विंटलमागे अनुदान द्यावे, तसेच हमीभाव जाहीर करावा अशी मागणी करून कांदा व द्राक्षाच्या भावप्रश्नी शासनाने कायमस्वरूपी धोरण निश्चित करावे, अशी मागणी आमदार किशोर दराडे यांनी विधानपरिषदेत केली. जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी कवडीमोल बाजारभाव मिळत असल्याने मेटाकुटीला आला आहे. शेतकऱ्यांच्या संतापाची भावना लक्षात घेऊन आमदार दराडे यांनी कांदा, द्राक्षप्रश्नी धोरण निश्चित करून शेतकऱ्यांची होणारी फरपट थांबवण्याची मागणी केली. यावर्षी अल्पदराने विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल कमीत कमी पाचशे रुपये ते हजार रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी त्यांनी केली.
द्राक्ष उत्पादक हवामानाच्या लहरीपणामुळे तसेच व्यापाऱ्यांच्या फसवणुकीच्या घटनांमुळे त्रस्त झाला आहे. त्यामुळे शासनाने धोरण निश्चित करून द्राक्ष उत्पादक शेतकरी व कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली. शेतकऱ्यांना शेतीसाठी फक्त दिवसाच वीजपुरवठा होत आहे परिणामी रात्र-रात्र जीव धोक्यात घालून पिकांना पाणी देण्याची वेळ येत असल्याने दिवसा वीज मिळावी यासाठी सौर पंपासाठी १०० टक्के अनुदान उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.