आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आवाहन:6262256363 या नंबरवर द्या जिल्ह्यातील अवैध धंद्यांची माहिती

नाशिक2 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात सुरू असलेले अवैध धंदे बंद करण्याची माेहीम पाेलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी हाती घेतली असून त्यासाठी ६२६२२५६३६३ या नंबरची हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. नाशिक शहर पाेलिस आयुक्तालयाच्या हद्दी वगळता जवळपास १० पाेलिस ठाण्यांसह जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही हेल्पलाइन सुरू राहणार आहे. या हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन उमाप यांनी केले आहे.

नावे गाेपनीय ठेवणार
नाशिकच्या जवळपास १० पाेलिस ठाण्यांसह जिल्ह्यातील ४० पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुठेही अवैध धंदे सुरु असल्यास हेल्पलाईनवर संपर्क साधावा. तक्रारदाराचे नाव गोपनिय ठेवले जाईल. तक्रारीची दखल घेत तत्काळ कारवाई केली जाईल. - शहजी उमाप, पाेलीस अधीक्षक

बातम्या आणखी आहेत...