आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानिष्काम कर्मयोगी जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांनी आपले संपूर्ण आयुष्य जनकल्याणासाठी दिले. असंख्य भाविकांच्या जीवनाला योग्य दिशा देऊन त्यांना सदमार्गावर आणले. अशा महान शिवयोगी बाबाजींची भक्ती करताना त्यांनी सुरू केलेल्या विविध परंपरेला व नित्यनियमांना सर्वोच्च स्थान द्या, असे आवाहन स्वामी शांतीगिरीजी महाराज केले.
जगद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराजांच्या ३३ व्या पुण्यस्मरणार्थ येथील देवभूमी जनशांती धामात आयोजित राष्ट्रनिर्माण धर्म सोहळ्याची सांगता अभिषेक पूजन, संत-अतिथी-ब्राह्मण पूजन, पाद्य पूजन आणि लक्षवेधी पालखी मिरवणुकीने फटाक्यांच्या आतिषबाजीत आणि जय बाबाजींच्या प्रचंड जयघोषात झाली. पहाटे ४ वाजता परमपूज्य बाबाजींच्या मूर्तीचा व भगवान बाणेश्वराचा महाभिषेक झाला. पहाटे ५ वाजता नित्यनियम विधी, महाआरती, सत्संग झाला.
स्वामी शांतीगिरीजी महाराज यांनी ‘गुरुसेवेचा आनंद मोठा, नाही आनंदाला तोटा’ अंतःकरणापासून बाबाजींचे सेवाकार्य केल्यास विशेष आनंदाची प्राप्ती होते, असे सांगितले. जपानुष्ठानात सहभागी झालेल्या हजारो भाविकांच्या मौनव्रताची सांगता, महायज्ञाची पूर्णाहुती करण्यात आली. स्वरसिंधुराचे संचालक राहुल शिंदे यांनी सुमधुर भक्तिगीते सादर केली.
जिल्हा सेवक राजाराम पानगव्हाणे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. राष्ट्रनिर्माण सोहळा यशस्वितेसाठी कार्यक्रम समिती, सल्लागार समिती, जिल्हासेवक, तालुका सेवक, गावसेवक, विश्वस्त, आश्रम कमिटी, महिला भक्त समिती आणि जय बाबाजी भक्त परिवारातील भविकांनी विशेष परिश्रम घेतले. पुण्यस्मरणानिमित्त जगदगुरू बाबाजींच्या दर्शनासाठी हजारो भविकांनी उपस्थित होते. दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.