आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गौरव:पेठे मध्ये गुणवंतांचा गौरव; शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ. सतीश बागल

नाशिक4 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाएसाेच्या रविवार कारंजा येथील पेठे विद्यालयातील शालांत परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव साेहळा उत्साहात पार पडला.

संस्था अध्यक्ष प्रा. सूर्यकांत रहाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा साेहळा पार पडला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड तर प्रमुख अतिथी म्हणून शाळेचे नामवंत माजी विद्यार्थी डॉ. सतीश बागल उपस्थित होते. व्यासपीठावर संस्था कार्यवाह राजेंद्र निकम, मुख्याध्यापक कैलास पाटील, उपमुख्याध्यापिका संगीता थोरात, पर्यवेक्षक रवींद्र पगार, शिक्षक प्रतिनिधी शैलेश पाटोळे, पालक-शिक्षक संघाच्या उपाध्यक्ष मनीषा सानप, नाएसो क्रेडिट सोसायटीचे मानद सचिव साहेबराव पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी ओंकार सानप, ईशा नागपुरे, लोकेश सानप, निनाद बोरसे, कृष्णा चुंबळे, समृद्धी ढाकणे या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. प्रमुख अतिथी डॉ. सतीश बागल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सुजाण व उत्तम नागरिक म्हणून कसे जगता येईल हे सोदाहरण स्पष्ट केले. अध्यक्ष मनोगतातून शालेय समिती अध्यक्ष चंद्रशेखर वाड यांनी विद्यार्थ्यांना पुढील भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी आपल्या मनोगतातून ओंकार सानप या विद्यार्थ्याने शाळेने उपलब्ध करून दिलेल्या भौतिक सोयीसुविधांमुळे तसेच शिक्षकांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य केल्यामुळेच आज आम्हाला यशप्राप्ती झाली असे सांगितले.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक कैलास पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रशांत साबळे यांनी करून दिला. सूत्रसंचालन मीनल पत्की यांनी तर आभार प्रदर्शन उमेश देवरे यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...