आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएस.एम.आर.,के.बी.क., ए. के. महिला महाविद्यालय, गृहविद्यान शाखा व होम सायन्स अससोसिएशन नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने ‘गो ग्रीन: रेस्पॉन्सिबल प्राॅडक्शन अँड कनसम्पशन’ या विषयावर एक दिवसीय व्हरच्युल आंतरराष्ट्रीय वेबिनार घेण्यात आले. आझादी अमृत महाेत्सव व डाॅ. माे. स. गाेसावी यांच्या वाढदिवसाचे आैचित्य साधून या वेबिनारचे आयाेजन करण्यात आले हाेते. प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे यांनी गोखले एज्युकेशन सोसायटी व एस. एम. आर. के महिला महाविद्यालयाबद्दल सविस्तर माहिती दिली. उपप्राचार्या डॉ. कविता पाटील यांनी मान्यवरांची ओळख करून दिली.
मेगॅसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्र सिंह यांनी पाण्याचा गैर वापर टाळण्यासाठी लोकांमध्ये शिक्षणाची खूप गरज आहे. पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन व साठा करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कारण भविष्यात पाण्याचे जतन केले नाही तर पुढच्या पिढीला पाण्यासाठी माेठा संघर्ष करावा लागू शकताे. त्यामुळे पावसाचे वावा जाणारे पाणी वाचविले तर जमिनीतील पाण्याची पातळी वाढेल. विद्यार्थ्यांनी या चळवळीसाठी पुढाकार घेण्याचे आवाहन त्यांनी केले.
प्रज्ञा अभ्यंकर, दुसरे प्रसिद्ध वक्ते अतिरिक्त वन संवर्धक डॉ. व्ही. के. मोहन, यांनी जंगलाचे महत्व आणि जंगल संवर्धना बद्दल सविस्तर माहिती दिली. डॉ. व्ही. के. मोहन जैविक खत निर्मिती बद्दल सोप्या भाषेत सर्वांचे मार्गदर्शन केले. कॉलेजच्या माजी विद्यार्थिनींनी सदर विषयाबद्दल आपले मत व्यक्त केले. मानव संसाधन, विभाग प्रमुख, संगीता कांबळे यांनी आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये सहभागी झालेल्या सर्व प्राध्यापक व विद्यार्थिनीचे आभार मानले. सेमिनारला आंतरराष्ट्रीय स्तरावर विद्यार्थी व शिक्षकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.