आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशाळेचे आयोजन:आजपासून शेळीपालन; कुक्कुट पालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र शासन, महाराष्ट्र शासन व आयएसओ प्रमाणित युवा उद्योजगता प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. ६ व सोमवार दि. ७ नोव्हेंबर असे दोन दिवस दुपारी २ ते सायंकाळी ६ या वेळेत मोफत बंदिस्त शेळीपालन, कुक्कुटपालन व दुग्ध व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

गोळे काॅलनी परिसरातील मेहेर सिग्नल येथील वैशाली हाॅलमध्ये ही कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेत चार व गोठा व्यवस्थापन, आजार- उपचार लसीकरण, विक्री व्यवस्थापन, शासकीय अनुदान व बँकिंग कर्ज प्रकरणे या विषयी बारामती येथील पशुधन पर्यवेक्षक डाॅ. विकास शिंगाडे हे मार्गदर्शन करणार आहे. सहभागी होण्यासाठी ७५५८५२४९०७ या क्रमांकावरर संपर्क साधावा.

बातम्या आणखी आहेत...