आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापुजन:गोदापूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येस नाशकात समर्थ सेवेकऱ्यांचे गोदा स्वच्छता अभियान

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवामार्गाच्या पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने शुक्रवारी (दि. ३) होणाऱ्या गंगापूजन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला सेवेकऱ्यांनी गुरुवारी दुपारनंतर गोदा स्वच्छता अभियान हाती घेतले. सेवामार्ग पर्यावरण विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे व माजी नगरसेविका वत्सला खैरे यांच्या हस्ते या उपक्रमाचा प्रारंभ झाला. १ जून ते ९ जून या कालावधीत समर्थ सेवामार्गाचा गंगादशहरा उत्सव होत आहे. या कालावधीत गंगापूजन सोहळ्याची परंपरा अनेक वर्षांपासून कायम आहे. यावर्षी आज संध्याकाळी हा सोहळा होत असून त्यानिमित्ताने नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. नाशिक परिसरातील महिला-पुरुष सेवेकऱ्यांनी गुरुवारी रामकुंड व तपोवन परिसरात स्वच्छता केली तर राज्यभरात सेवेकरी आपापल्या गावांतील नद्यांची स्वच्छता करणार असल्याचे सांगण्यात आले. गावागावात प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पती व रोपांची लागवडही करण्यात येत आहे. रामकुंड परिसरात या अभियानाचा प्रारंभ करीत सेवेकऱ्यांनी कचरा स्वच्छता केली. त्यानंतर बालाजी कोट समर्थ केंद्रात सर्व सेवेकऱ्यांनी नदी स्वच्छतेचे महत्त्व सांगणारी नाटिका सादर केली. प्रतिज्ञा म्हणून सर्वांनी हे काम पुढे नेण्याचा संकल्प केला.

बातम्या आणखी आहेत...