आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूजन सोहळा:समर्थ सेवेकऱ्यांचे नाशिकसह राज्यभरात गोदा स्वच्छता अभियान, नदी स्वच्छता प्रतिज्ञा म्हणून पुढे नेण्याचा संकल्प

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ सेवा मार्गाच्या पर्यावरण प्रकृती विभागाच्या वतीने शुक्रवारी होणाऱ्या गंगापूजन सोहळ्याच्या निमित्ताने सेवेकऱ्यांनी गुरुवारी दुपारनंतर गोदा स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले. सेवामार्ग पर्यावरण विभागाचे प्रमुख आबासाहेब मोरे व माजी नगरसेविका वत्सला खैरे यांचे हस्ते अभियानास प्रारंभ झाला.

1 जून ते 9 जून पर्यंत गंगादशहरा उत्सव सुरु करण्यात आला असून या कालावधीत गेल्या 50 वर्षांपेक्षा अधिक काळापासून समर्थ सेवामार्गाचा गंगापूजन सोहळा होत असतो. शुक्रवारी संध्याकाळी हा सोहळा होत असून याच निमित्ताने नदी स्वच्छता अभियान हाती घेण्यात आले आहे.

नाशिक परिसरातील महिला पुरुष सेवेकऱ्यांनी गुरुवारी रामकुंड व तपोवन परिसरात स्वच्छता केली तर राज्यभरात सेवेकरी आपापल्या गावातील नद्यांची स्वच्छता करणार असल्याचे सांगण्यात आले. गावागावात प्रदूषण कमी करणाऱ्या वनस्पती व झाडांची लागवडही करण्यात येत आहे. रामकुंड परिसरात या अभियानाचा प्रारंभ करीत सेवेकऱ्यांनी कचरा स्वच्छता केली. स्वच्छता झाल्यानंतर बालाजी कोट समर्थ केंद्रात सेवेकऱ्यांनी नदी स्वच्छतेचे महत्व सांगणारी नाटिका सादर केली. नदी स्वच्छता प्रतिज्ञा म्हणून सर्वांनी हे काम पुढे नेण्याचा संकल्प केला.

बातम्या आणखी आहेत...