आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Nashik
  • Godavari River Nashik | Marathi News Nashik | To Drink The Water Of Gadavari, Only Half; Not Even Worthy Of A Bath; Health Is Endangered Due To Moss Accumulation In River Basin

आरोग्य धोक्यात:गाेदावरीचे पाणी पिण्यासाठी तर साेडाच; अंघोळीच्याही लायक नाही; नदीपात्रात शेवाळ साचल्याने आरोग्य धोक्यात

नाशिक6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गाेदावरी म्हणजे महाराष्ट्रातील गंगाच. परंतु, यात मिसळणाऱ्या मलजलामुळे या पवित्र नदीचे पाणी आता पिण्यासाठी सोडा, साधे स्नानाच्याही लायक राहिलेले नाही. एवढेच नव्हे, रामसर साइट म्हणून घोषित नांदूर-मधमेश्वर पक्षी अभयारण्यातील जैवविविधता यामुळे धोक्यात आली आहे. याबाबत राष्ट्रीय हरित लवादाने तीव्र नाराजी व्यक्त केली असून प्रदूषण निवारणात अपयशी दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई का केली नाही, अशी विचारणा राज्य नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांना केली आहे.

गोदावरी भाविकांसाठी अत्यंत पवित्र. परंतु, या नदीत उगमाच्या ठिकाणीच त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषित पाणी सोडले जाते. याची दखल घेऊन पर्यावरणप्रेमींनी राष्ट्रीय हरित लवादासह सर्वोच्च न्यायालयात २०१४-१५ मध्ये याचिका दाखल केली होती. २०१७ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने नदी प्रदूषण मुक्तीचे आदेश दिले होते. पण त्यावर कारवाई झालीच नाही. २०१९ मध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये निवृत्तीनाथ महाराज यात्रेनिमित्त निर्मलवारी उपक्रम राबवण्यात आला. या वेळी सर्व मल थेट नदीत मिसळत होते. त्याची तक्रार डॉ. किरण कांबळे यांनी राष्ट्रीय हरित लवादात केली होती. त्यावर ११ फेब्रुवारी २०२२ रोजी सुनावणी झाली. लवादाने तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्र सरकार, त्र्यंबकेश्वर नगरपालिका आणि नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. लवादाने वारंवार बजावूनही प्रदूषण मुक्तीबाबत कुठलीही कारवाई झाली नाही.

प्रधान सचिवांचे तात्पुरत्या व्यवस्थेचे आश्वासन
२०२३ पर्यंत एसटीपी प्लँट कार्यान्वित होणार नसल्याने तोपर्यंत नदीत मलजल मिसळणार नाही यासाठी तत्काळ तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था केली जाईल, असे आश्वासन नगरविकासच्या प्रधान सचिवांनी व्हीसीद्वारे लवादास सांगितले होते.

फोटोंसह दिली होती लवादाकडे तक्रार
आम्ही २०१९च्या निर्मलवारीवेळी नदीत मिसळलेल्या मलजलाच्या फोटोंसह लवादाकडे तक्रार केली होती. लवादाच्या, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अद्यापही कारवाई झालेली नाही. लवादाने त्याबाबत नुकत्याच झालेल्या सुनावणीत नाराजी व्यक्त केली आहे. - डाॅ. किरण कांबळे, तक्रारदार
लवादाने ओढले ताशेरे

  • त्र्यंबकेश्वर नगरपालिका क्षेत्रात ४.५ ते ५ एमएलडी सांडपाण्याची निर्मिती होते. कुठलीही प्रक्रिया न करता ते नदीत सोडले जाते.
  • राज्य सरकारला केलेल्या १ कोटी रुपये दंडाची रक्कमच नगरपालिकेला मलजल शुद्धीकरण प्रकल्पासाठी दिली. परंतु अजूनही ऑगस्ट २०२३ पर्यंत हा प्रकल्प सुरू होणार नसल्याने आता नागरिकांच्या आरोग्याचे काय, असा प्रश्न लवादाने उपस्थित केला.
  • सॉलिड वेस्ट, अंडरग्राउंड ड्रेनेज लाइनद्वारे येणाऱ्या सांडपाण्याचा निचरा कसा होतो, याचा अहवाल लवादास दिला गेला नाही.
  • मानवी आराेग्यासाेबत नांदूर-मधमेश्वरचे पक्षी अभयारण्यही संकटात : हरित लवाद
बातम्या आणखी आहेत...