आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'चला जाणूया नदीला' अभियानातून 'गोदावरी'ला वगळले:गोदावरी प्रेमी संघटनांकडून रामकुंडावर आत्माकलेश आंदोलन

नाशिक25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने महाराष्ट्र शासनाच्या वतीने चला जाणू नदीला या अभियानात गोदावरी नदीला वगळल्याने या विरोधात रामकुंडावर आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्त महाराष्ट्रातील ७५ नद्या उपनद्या यांचे जल अमृत व्हावं यासाठी नदियात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.मात्र गोदावरीला स्थान दिलेले नाही.

शासनाच्या ‘चला जाणूया नदीला’ या अभियानात जिल्ह्यातील जवळपास सर्वच उपनद्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मात्र जागतीक ओळख असलेल्या १२ वर्षांनी होणाऱ्या कुंभमेळा ज्या नदीच्या काठावर होतो. अशा पवित्र गोदावरी नदीचा समावेश या नदी यात्रेच्या यादीमध्ये केलेला नाही.

गोदावरी प्रेमी संघटनांकडून शासनाकडे सातत्याने पत्रव्यवहार करूनही अद्याप शासन व प्रशासनाने गोदावरी नदीचा समावेश शासकीय अध्यादेशामध्ये केलेला नाही. हा गोदावरी आणि नाशिककरांवर अन्याय आहे. याविरोधात संताप व्यक्त करण्यात येत असून शासनाचे व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी साधूमहंत, पुरोहित संघ, सामाजिक संस्था संघटनांचे प्रतिनिधी व पर्यावरण प्रेमी यांच्यावतीने शासनाच्या या निर्णयाचा तीव्र निषेध व्यक्त करत गोदावरी नदी गंगा घाटावरील रामकुंडावर आत्मक्लेश करण्यात आले. साधू, महंत, पुरोहित संघ, नाशिककर आणि पर्यावरण प्रेमी यांच्यावतीने रामकुंड येथे आत्मक्लेष करण्यात आले.

महंत भक्तीचरदास महाराज, महंत राजाराम महाराज, पुरोहित संघाचे अध्यक्ष सतीश शुक्ल, निशिकांत पगारे, काँ. राजू देसले, एनजीओ फोरमचे मुक्तेश्वर मुनशेट्टीवार, राजू शिरसाठ, नंदिनी नदीचे प्रा. सोमनाथ मुठाळ, वरूना नदीचे सुनील परदेशी, राहुल जोरे , वीरेंद्र टिळे, रोहित कानडे, आळंदी नदीचे तुषार पिंगळे, प्रभाकर वायचळे, सुरेश भोर, डॉ अजय कापडणीस, योगेश कापसे , जगबिर सिंग, सुरेंद्र बोरसे, वैशालीताई चव्हाण, भारतीताई जाधव व मंगलाताई पिसे, आधी प्रतिनिधी उपस्थित होते. याप्रसंगी पंचवटी पोलीसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करून सोडून देण्यात आले.

आंदोलनकर्ते ताब्यात

शहरात जमाव बंदी आदेश लागू आहेत. विनापरवानगी आंदोलन केल्याने पंचवटी पोलिसांनी गोदावरी प्रेमींना ताब्यात घेत चौकशी करुन सुटका केली.

कलश परत देणार

गोदावरी नदीचा समावेश चला जानू या नदीला या अभियानात व्हावा यासाठी सातत्याने प्रशासनासोबत पाठपुरावा केला होता. तरी देखील शासन, प्रशासन दखल घेत नसेल तर नदी यात्रेसाठी उपनद्याना जे कलश देण्यात आलेले आहेत ते सर्व कलश लवकरच शासनाला परत केले जातील.- निशिकांत पगारे, गोदावरी नदी संवर्धन समिती

बातम्या आणखी आहेत...