आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाळा:गोखले एज्युकेशन सोसायटीच्या; 22 वर्षांनी भरली माजी विद्यार्थ्यांची शाळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या सिन्नर शाळेत वर्षे १९९९ -२००० दहावीला असणाऱ्या बॅचचे स्नेहसंमेलन नुकतेच पार पडले. या अनोख्या संमेलनाचे ब्रीदवाक्य होते ‘प्राजक्ताच्या सावलीत पुन्हा प्राजक्ताची फुले’२२ वर्षांनी सर्व माजी विद्यार्थी भिकुसा हायस्कूल या आपल्याच पाचवी ते दहावीच्या शाळेत पुन्हा जमा झाले होते. सर्व विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.

माजी विद्यार्थी मेळाव्यानिमित्त उपस्थित सर्वांचा फेटे बांधून सत्कार करण्यात आला. विशेष म्हणजे त्यावेळचे अन् आता निवृत्त झालेल्या शिक्षकांनाही आग्रहाचे आमंत्रण होते. त्यांनी माजी विद्यार्थ्यांची गरुडझेप पाहून समाधान व्यक्त केले. जे शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे निधन झाले त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शिक्षकांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. शाळेचे आताचे मुख्याध्यापक ब्राह्मणे यांनी विद्यार्थ्यांना भावनिक साद घालत शाळेला आता असणाऱ्या गरजा, आत्ताच्या शाळेविषयी माहिती दिली.

विद्यार्थ्यांनी सर्वांनी एकत्र मिळून शाळेला सर्व वर्ग खोल्यांना व इमारतीला रंगरंगोटी करून देण्याचे ठरवले व तसा शब्द दिला. यावेळी मुख्याध्यापकांनी माजी विद्यार्थ्यांचे आभार मानले. कार्यक्रमाचे आयोजन रवींद्र ढमाले, नवनाथ सांगळे, प्रियंका क्षत्रिय, योगिता उबाळे आदींनी केले. गणेश तांबे, सागर मुंडे, प्रदीप लोखंडे, प्रशांत वाकचौरे, विशाल काळे, सागर नाईक, रतन वाकचौरे, प्रसाद कापडे, गौरव जोशी, नितीन सांगळे, अमोल सांगळे, खंडू सांगळे, संजय सांगळे, भगवान पथवे आदींनी विशेष मेहनत घेतली. सूत्रसंचालन नवनाथ सांगळे व स्वाती गिते यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...