आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हास्तरीय शालेय रायफल शुटिंग स्पर्धा:नेमबाज मयुरी सांगळे अन् अर्णव कापडणीसला सुवर्णपदक

नाशिक8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्हा क्रीडा अधिकारी आणि जिल्हा नेमबाजी संघटने मार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत आयोजित जिल्हास्तरीय आंतरशालेय रायफल शूटिंग स्पर्धा कै. भीष्मराज बाम मेमोरियल शूटिंग रेंज सातपूर येथे विविध गटात स्पर्धा आयाेजित करण्यात आली हाेती. या स्पर्धेत शहरातील सर्व शाळेतील 150 स्पर्धक सहभागी झाले होते.

या स्पर्धेत पीप साईड एअर रायफल खेळ प्रकारात मराठा हायस्कूलच्या इयत्ता आठवीतील मयुरी सांगळे हिने 17 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली व होरायझन स्कूलच्या इयत्ता आठवीतील अर्णव कापडणीस ने 14 वर्षाखालील वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदकाची कमाई केली.

पुरस्कारार्थीचा पदके देऊन सन्मानित करण्यात आले हाेते. त्यांच्या या विजयामुळे विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी पात्र झाले आहे. स्पर्धेतील विजेत्या सर्व खेळाडूंना प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश टिळे व शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त आंतरराष्टीय खेळाडू, प्रशिक्षक व पंच श्रद्धा नालंमवार यांच्या हस्ते पदक देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी प्रशिक्षक, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सौरव व्यवहारे, नीलेश गरुड व मनोज जोशी यांनी श्रद्धा नालांमवार यांच्या मार्गदर्शनाखाली पंच म्हणून काम पाहिले.

हे दोन्ही नेमबाज नासिक जिमखान्याच्या शूटिंग रेंजवर प्रशिक्षक श्रद्धा नालंमवार व गणेश दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली नियमित सराव करतात.नाशिक जिमखानाच्या रायफल नेमबाज यांचा या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नरेंद्र छाजेड, उपाध्यक्ष नितीन मोडक, अनिल चुंबळे, सचिव राधेश्याम मुंदडा, कोषाध्यक्ष नितीन चौधरी, सहसचिव शेखर भंडारी, अलीअसगर आदमजी, अभिषेक छाजेड, प्रमोद रानडे, राजेश भरवीरकर, शूटिंग सचिव मिलिंद जोशी, झुलकरनैन जागिरदार आदींनी पदक विजेत्या खेळाडूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

पदक विजेते खेळाडू

पीप साइट एयर रायफल

17 वर्षाखालील मुली

मयुरी सांगळे - सुवर्ण पदक (90, 88, 93,92 एकूण 363)

14 वर्षाखालील मुले

अर्णव कापडणीस - सुवर्ण पदक (78, 85, 82, 87 एकूण 332)

बातम्या आणखी आहेत...