आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सुवर्णालंकारांना आता विशिष्ट क्रमांक; १ जूननंतर विनाहॉलमार्क दागिने विक्रीलाही बंदी

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • हॉलमार्कचा ग्राहकांसह व्यावसायिकांना फायदा हाेणार

भारतीय मानक ब्युरोने नुकतेच परिपत्रक काढून १ जूनपासून साेन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क अनिवार्य केले असून यानंतर कोणत्याही सराफी व्यावसायिकाला विनाहॉलमार्क ज्वेलरी विक्री करता येणार नाही. भारतीय मानक ब्युरोनुसार फक्त २२, १८ व १४ कॅरेट साेन्याच्या दागिन्यांना हॉलमार्क सक्ती केलेली आहे याचबरोबर ब्युरोने एक सॉफ्टवेअर विकसित केले अाहे. त्याअंतर्गत आपण आपला दागिना हॉलमार्क कुठे केला व त्याची शुद्धता नेमकी किती अाहे याबाबत माहिती घेऊ शकणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक दागिन्याला एक युनिक आयडी नंबर दिला जाणार यामुळे प्रत्येक दागिन्याला एक वेगळी ओळख मिळणार असून सोने खरेदीत हाेणाऱ्या गैरव्यवहारांनाही आळा बसणार आहे.

या बदलाने ग्राहकांना दागिन्याच्या शुद्धतेची हमी मिळणार असून दागिन्यांच्या विशेष नंबरमुळे मालकीसंदर्भात स्पष्टता मिळेल. दागिना बीअायएसच्या अॅप्लिकेशनमध्ये टाकून त्याची शुद्धता व दागिना तयार झाल्याची तारीख मिळू शकेल. हॉलमार्क प्रमाणित व युनिक नंबर असल्याने कुठेही दागिन्यांची माेड करू शकताे. याचबराेबर दागिन्यांचा विमा उतरविणे सुलभ हाेणार अाहे.

हॉलमार्कचा ग्राहकांसह व्यावसायिकांना फायदा हाेणार
नाशिक जिल्हा पहिल्यापासूनच शुद्ध सोन्याच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध असल्याने हॉलमार्क सक्तीने व्यवसायिकांनाही त्याचा फायदा होणार आहे. सराफी व्यवसाय अाणखी पारदर्शक होण्यास मदत मिळणार आहे. हॉलमार्क सेंटर्सची कमतरता ही यात अडचण असून यामुळे दागिने घडविण्याची वेळ मात्र वाढणार हे नक्की अाहे. - चेतन राजापूरकर, संचालक महाराष्ट्र स्टेट बोर्ड, इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन

२४ आणि २३ कॅरेटकरिता याचा वापर नाही
नाशिकमधील सराफांनी यापूर्वीच हॉलमार्क सक्तीचे स्वागत केलेले आहे. मात्र हॉलमार्क सेंटर्सचे कमतरता असल्याने दागिना घडवायला वेळ वाढणार आहे. त्याचबरोबर आपल्या भागात जास्त करून २४ व २३ कॅरेट दागिन्यांची मागणी जास्त असते मात्र या दागिन्यांवर हॉलमार्क होणार नाही. त्यामुळे या चोखंदळ ग्राहकांना याचा फायदा होणार नाही.

बातम्या आणखी आहेत...