आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेन्याचे दर पुन्हा एकदा जीएसटीसह 55,300 रूपये प्रती दहा ग्रॅमवर जाऊन पाेहाेचले आहेत. विशेष म्हणजेे, आंतरराष्ट्रीय साेने मानक संस्थांच्या नुसार आज विना जीएसटी हे दर 53 हजारांच्या आसपास असले तरी हा भाव मार्च 2023 पर्यंत 55 ते 56 हजारांवर पोहचेल. असे गुंतवणूक तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
काेराेना काळात सगळीकडे लाॅकडाऊन हाेता, परिस्थिती अनिश्चित हाेती, त्यामुळे गुंतवणुकीतून हमखास परतावा देणारा पर्याय म्हणून साेन्याकडे गुंतवणूकदार वळले हाेते. याचमुळे दर 56 हजारांच्या विक्रमी स्तरावर गेले हाेते. यानंतर मात्र निर्बंध शिथील झाल्यानंतर हे दर 47 हजारांपर्यंत खाली येवून स्थिर हाेते मात्र त्यानंतर हे दर गेल्या दाेन महिन्यांपासून सातत्याने वाढत आहेत, याला कारणीभुत अशीच अस्थिर आणि अनिश्चित परिस्थिती जगभरात पहायला मिळत असल्याचे प्रमुख कारण असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मंदी सदृश्य परिस्थिती हे प्रमुख कारण
डाॅलरमध्ये जगभरात उलथापालथ सुरू आहे, बऱ्याच देशांनी डाॅलरमध्ये देवाण-घेवाण बंद केल्याने डाॅलरला उतरती कळा लागली आहे. प्रमुख बलाढ्य देशांत सध्या मंदी सदृश्य परिस्थिती आहे, पण त्याचा परिणाम भारतावर फारसा हाेणार नाही हेही गुंतवणूकदारांनी मान्य केले आहे. याचमुळे बहुतांश देशांच्या केंद्रीय बॅंकांनी माेठी खरेदी करून साेने रिझर्व्ह करण्यास सुरूवात केली आहे. यातूनच साेन्याची मागणी अजून वाढणार असल्याने दरांतील तेजीही वाढत जाणार अशी लक्षणे आहेत.
पुढच्या दिवाळीत गाठू शकते 60 हजारांचा टप्पा
जागतिक शेअरबाजार खाली जातात तेव्हा आंतरराष्ट्रीय बाजारात साेने दर वाढतात. भारत 800 ते 900 टन साेने दरवर्षी आयात करताे. त्यापैकी गेल्या सातच महिन्यात 850 टन आयात झाली असून लग्नसराइमुळे 350 टन साेने अजून आयात हाेऊ शकते. जागतिक कारणांचा विचार करता पुढील दिवाळीपर्यंत हे दर दहा ग्रॅमकरीता 60 हजारांवर जाऊ शकते.
- मुकेश चाेथाणी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.