आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धवट जळालेल्या मृतदेहाचा छडा:वडाळा येथील सराईत गुन्हेगार गोल्डीचा खून आर्थिक वादातून

नाशिक/घोटी23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वडाळा येथील सराईत गुन्हेगार मुजाहिद ऊर्फ गोल्डन अफजल खान (२३) याचा खून आर्थिक वादातून त्याच्या साथीदारांनी केल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी रामेश्वर ऊर्फ राम मोतीराम गर्दे (३०, रा. स्नेह संकुल, अशोका मार्ग, नाशिक), सलमान ऊर्फ माम्या वजीर खान (रा. वडाळागाव, नाशिक), सदाशिव ऊर्फ शिव पाराजी गायकवाड (रा. वडाळागाव, म्हाडा कॉलनी, नाशिक) यांना अटक केली. त्यातील एक संशयित फरार आहे.

याबाबत पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. घोटी पोलिस ठाण्याच्याय हद्दीत २४ एप्रिल रोजी वैतरणा धरणाच्या बॅकवाॅटर परिसरात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला होता. घोटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. त्याचा घोटी पोलिस आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास केला. गोल्डी हा वडाळा गावातील असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने सखोल तपास केला असता त्याच्या गुन्हेगार साथीदारांनी स्कोडा (एमएच १५ ०६ एव्ही ३३४४) या कारमधून पार्टी करण्यासाठी वैतरणा डॅमवर गेले होते. येथे वाद झाले. संशयितांनी गळा चिरून गोल्डीचा खून केला.

अोळख पटू नये म्हणून मृतदेह प्लॅस्टिकच्या गोणीमध्ये टाकून पेट्रोलने पेटवून देण्यात आला. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली कार जप्त करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आणखी एक आरोपी हा फरार असून पोलिस त्याचा कसोशीने शोध घेत आहेत. यातील आरोपी हे नाशिक शहरातील सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी दुखापत, जबरी चोरी, घरफोडी असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. मृत गोल्डीविरुद्धही गंभीर गुन्ह्यांची नोंद होती. तो तडीपार होता. घोटी पोलिस ठाण्याचे सहायक निरिक्षक दिलीप खेडकर, शीतल गायकवाड, संतोष दोंदे, योगेश यंदे यांच्या पथकाने तपास व तीन जणांच्या अटकेची कारवाई केली. .

बातम्या आणखी आहेत...