आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारात:गोल्फ क्लब जॉगिंग ट्रॅक ; पाच दिवसांपासून अंधारात

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील लहानापासून ते ज्येष्ठांपर्यंत व्यायामप्रेमींसाठी महत्त्वाचे केंद्र बनलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरील(गोल्फ क्लब) जॉगिंग ट्रॅकवर सुमारे १२ काेटींचा खर्च करून नूतनीकरण करण्यात आले असले तरी मनपाच्या क्रीडा व विद्युत विभागातील असमन्वयाने ट्रॅकवरील पथदीपांचा पाच ते सहा दिवसांपासून वीजपुरवठा थकबाकीमुळे बंद केला आहे. त्याचा फटका जॉगर्सला बसत असून मनपाच्या कारभारावर व्यायामप्रेमी संताप व्यक्त करीत आहे.

राज्यात सर्वांधिक जॉगिंग ट्रॅक असलेले शहर म्हणून नाशिकची ओळख निमार्ण झाली असून जॉगिग ट्रॅक नाशिककरांचा श्वास बनली असताना अशी स्थिती आहे. आमदार प्रा. देवयानी फरांदे यांच्या व मनपाच्या संयुक्त निधीतून सुमारे १२ कोटी रुपये खर्च करून नूतनीकरण करण्यात आलेले असताना ट्रॅकवर नियमित पाणी न मारल्याने धूळ उडणे, झाडांना वेळेवर पाणी नसल्याने सुकण्याचे प्रकार होत आहे.

त्यातच सर्वाधिक गर्दी असलेल्या याच ट्रॅकवर संध्याकाळनंतर पथदीप व इतर दिवे बंद असल्याने शेकडो महिला, पुरुषांना अंधाराच्या भीतीने विनाव्यायाम घरी परतावे लागत आहे. तक्रारीचा तर उपयोगच नाही.दरम्यान, माजी नगरसेवक जाधव यांच्याशी संपर्क साधला असता बांधकाम विभागाने अवघ्या दोन लाख रुपयांचे बिल न भरल्याने वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केला असल्याची मला मिळाली असल्याचे त्यांनी सांगितले.

ही तर लाजिरवाणी बाब
^महापालिकेकडे जॉगिंग ट्रॅकवरील वीज बिलाची किरकाेळ रक्कम भरण्यासाठी पैसे नसतील तर ही लाजिरवाणी बाब आहे. एकीकडे मनपाचा अर्थसंकल्प दीड हजार कोटींच्या घरात असताना इकडे इतके दुर्लक्ष.
- प्रशांत जाधव, माजी नगरसेवक

मनपा शहर अभियंता नितीन वंजारी म्हणाले

सोमवारी बिल भरल्यावर वीजपुरवठा तातडीने सुरळीत केला जाईल. जॉगर्स विनय बिरारी यांनी प्रतिक्रिया दिली की, अंधार असल्याने जॉगिंग ट्रॅकवर कुत्रे उपद्रवी ठरताय. स्वच्छतागृहांची नियमित साफसफाई होत नाही.

बातम्या आणखी आहेत...