आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमती लांडे समग्र कविता पुस्तकाचे प्रकाशन:सर्जनशीलता लाभल्यास चांगली काव्यनिर्मिती ; प्रा. कसबे यांचे प्रतिपादन

नाशिक2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

सर्जनशीलता लाभलेली असते, तोच चांगले काव्यनिर्मिती करू शकतो. सुमती लांडे यांच्या कविता या संपूर्ण मानवजातीच्या व्यथा आहेत, त्या सकल माणसांच्या कविता आहेत. या कवितेत माणसांच्या जगण्याची गोष्ट सांगितलेली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रावसाहेब कसबे यांनी केले.

विश्वास ग्रुप यांच्या सौजन्याने आणि कॉपर कॉइन, रेड स्पॅरो मीडिया हाउस, दर्पण समाचार, सोशल नेटवर्किंग फोरम यांच्या वतीने आयाेजित ‘सुमती लांडे कविता समग्र कविता’ या पुस्तकाच्या प्रकाशनप्रसंगी प्रा. कसबे बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून अभिनेते सयाजी शिंदे, कादंबरीकार रंगनाथ पठारे, समीक्षक डॉ. राजन गवस उपस्थित होते. व्यासपीठावर कॉपर कॉइनचे सरबजीत गरचा, विश्वास ठाकूर, कविता मुरुमकर, कवयित्री सुमती लांडे, कवी प्रकाश होळकर उपस्थित होते.

अभिनेते सयाजी शिंदे यांनी विविध अनुभव सांगताना कवितेचे महत्त्व स्पष्ट केले. वृक्ष प्रसाद योजना सुरू करणार असल्याचे सांगितले. झाडाएवढा सेलिब्रिटी कोणीच नाही, सेलिब्रिटी सावली देत नाही, झाडे फळे आणि फुले देतात, असेही त्यांनी सांगितले. अभिनेते व कवी किशोर कदम यांनी ध्वनी चित्रफितीच्या माध्यमातून उपस्थितांची संवाद साधला. प्रथम सत्रात साहित्यिक एकनाथ पगार, कविता मुरुमकर, प्रा.डॉ. भास्कर ढोके यांनी विचार मांडले.अध्यक्षीय समारोपात राजन खान म्हणाले की, सुमतीताई यांची कविता सुफी पद्धतीची वाटते. सूत्रसंचालन दत्ता पाटील यांनी केले.

बातम्या आणखी आहेत...