आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापवार आडनावाबद्दल भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल श्रीमंत राजे पवार घराणे प्रतिष्ठाणतर्फे नाशिक पोलिस आयुक्तांना निवेदन करण्यात आले आहे. यामध्ये पवार कुळाविषयी अपमानकारक, बदनामीजनक धमकीचे वक्तव्य केल्यामुळे त्यांच्याविरोधात भादवि कलम 295 अ व 298 या तरतुदीनुसार कायदेशीर कार्यवाही करावी अशी मागणी करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
भारतीय जनता पार्टीचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी प्रसार माध्यमाद्वारे पवार ह्या आडनावाबद्दल वक्तव्य केले हेाते. त्यात ते म्हणाले होते की, महाराष्ट्राला पवार नावाची कीड लागली आहे ती काढावी लागेल. या वक्तव्य पडळकर यांनी बुद्धी पुरस्कर व दुष्ट भावनेच्या उद्देशाने भाष्य केलेले आहे, यामुळे महाराष्ट्रातील समस्त पवार बांधवांच्या भावना दुखावल्या गेल्या असून समस्त पवार वर्गाची बदनामी झालेली आहे. यातून पवार वर्गाला प्रचंड मानसिक त्रास होत आहे. त्यामुळे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी असे या निवेदनात म्हटले आहे. हे निवेदन नाशिक पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांच्यासाठी पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव यांना देण्यात आले.
ह्यावेळी श्रीमंत राजे पवार घराणे सामाजिक प्रतिष्ठानाचे जिल्हा अध्यक्ष आशुतोष पवार, सदश्य चंदन पवार, प्रवीण पवार संजय पवार,दत्ता पवार, जिल्हा कार्यकारणी प्रमुख, नितीन पवार, राजेश पवार, अनिरुद्ध पवार ईत्यादी पवार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, यावेळी दिलेल्या निवेदनात भाजपा आमदार पडळकर यांच्याकडून कायमच राजकीय नेत्यांना बोलताना कुठलाही विचार केला जात नाही आणि मी बऱ्याच असे विधान केले जातात जे अयोग्य असून त्याचा निषेध अंगणात येत आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.