आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये गोपीनाथ मुंडेंना अभिवादन:गोपीनाथ मुंडेंची वंचित, उपेक्षितांना न्याय देण्याची होती भूमिका, आमदार राहूल ढिकलेंकडून आठवनींना उजाळा

नाशिकएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांची वंचित, उपेक्षितांना न्याय देण्याची भूमिका होती. त्यांनी भाजप तळागाळात पोहचविला, असे मत नाशिकचे भाजप आमदार राहूल ढिकले यांनी व्यकत् केले आहे. आज भाजप नेते माजी केंद्रीय मंत्री लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त भाजप कार्यालय वसंतस्मृती येथे त्यांच्या प्रतिमेस आमदार राहूल ढिकले व भाजप शहराध्यक्ष यांच्याकडून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

काय म्हणाले ढिकले

यावेळी आमदार राहूल ढिकले म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात तळागाळात पोहचविला. अनेक कार्यकर्त्यांना मुख्य प्रवाहात आणून समाजातील वंचित उपेक्षित घटकांना न्याय देण्याची त्याची सदैव भुमिका असायची. त्यांचा जीवन प्रवास हा निश्चितच प्रेरणादायी आहे असे आ.ढिकले यांनी सांगितले.

भाजप शहराध्यक्ष गिरीष पालवे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, मध्य मंडल अध्यक्ष देवदत्त जोशी, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, सुजाता करजगीकर, अरुण शेंदुर्णीकर, गणेश कांबळे,शैलेश जुन्नरे, अमित घुगे, प्रतिक शुक्ल, ॲड.शाम बडोदे, संतोष नेरे, मिलींद भालेराव, पवन उगले, धनंजय पळसेकर, विजय काठे, सुरेश दराडे, दिनेश जाधव आदी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...